शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

.... अन्यथा दहा दिवसांत औरंगाबाद शहर चकाचक करून दाखवले असते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:22 IST

दि. ११ आॅक्टोबरपासून शहरातील सर्व कचरा उचलायला सुरुवात करून पुढील दहा दिवसांत संपूर्ण शहर चकाचक करण्याची योजना मी आखली होती.

ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कचरा उचलण्यास तूर्त स्थगिती

औरंगाबाद : दि. ११ आॅक्टोबरपासून शहरातील सर्व कचरा उचलायला सुरुवात करून पुढील दहा दिवसांत संपूर्ण शहर चकाचक करण्याची योजना मी आखली होती. यासाठी शहरातील झोनवार यंत्रणा तयार ठेवली होती; परंतु कन्नड येथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा कचरा पिशोर येथे आणून टाकण्यास विरोध केला. यात मी हीरो होईल व श्रेय मला मिळेल, हा द्वेष अधिक दिसतो. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील कचरा उचलण्यास मी तूर्त स्थगिती देत आहे, असे बुधवारी येथे कन्नडचे आमदार व शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केले.महापालिका स्वत: कचरा उचलण्यास असमर्थ ठरली आहे. मी कचरा उचलण्याचे नियोजन करण्यास तयार आहे किंबहुना माझ्याकडे हे नियोजन तयार आहे; परंतु मला हे काम करू दिले जात नाही. बरे असेही नाही की, मध्येच उठून मी हे काम करायला मागतोय. एक प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. पिशोर या गावी लोकवस्तीपासून ६ कि. मी. दूर असलेल्या एका निर्मनुष्य ठिकाणी कचरा आणून टाकण्याचे आवाहन केले होते, तसेच महिन्याच्या आत त्यांना तसे शक्य न झाल्यास मला स्वखर्चाने कचरा उचलू देण्यासाठी मनपाचा ठराव करून परवानगी देण्यासंदर्भात विनंती केली होती; मात्र या माझ्या उपक्रमास शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस यांनी आंदोलन करून पुन्हा विरोध केला आहे, तसेच मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक हे मला अजिबात प्रतिसाद देत नाहीत. माझा फोनसुद्धा उचलत नाहीत. ८ आॅक्टोबर रोजी सविस्तर पत्र पाठवून मी त्यांना कचरा उचलण्याची परवानगी मागितली होती; पण त्यावर काहीही निर्णय झालेला नाही, अशी माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली.

त्यांनी आणखी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादचा काही कचरा नेऊन त्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. त्यावेळेला औरंगाबादच्या कचऱ्याने कोणाच्याही आरोग्याला इजा न पोहोचता शेतक-यांना त्यातून खत निर्माण होते, हे मी सिद्ध करून दाखवलेले आहे. असे असताना मी जर औरंगाबाद शहर दहा दिवसांत कचरामुक्त केले, तर मनपाची नाचक्की होईल म्हणून मुद्दाम राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन सर्व पक्ष आज मला पुन्हा कचरा नेण्यासाठी विरोध करीत आहेत. एक तर स्वत: काही करायचे नाही आणि जो करतो त्यालाही करू द्यायचे नाही, असा उद्दामपणा हे लोक करीत आहेत. एकीकडे राज्य व केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी धडपड करा, असे सांगते, तर दुसरीकडे त्या सरकारमध्ये सामील असलेले प्रमुख पक्ष म्हणजेच शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते त्याला विरोध करतात, हे खरेच दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नPoliticsराजकारणHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका