लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १० हजार रूपयांपर्यंत शासन हमीवर तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य शासनाने बँकांना दिले आहेत़ या तातडीच्या कर्जमाफीसाठी २० जून २०१६ अखेरचे थकबाकीदार शेतकरी पात्र ठरणार आहेत़ शेतकऱ्यांना १० हजारांचे तातडीचे कर्जवाटप करण्यासाठी १४ जून २०१७, २० जून २०१७, १ जुलै २०१७ आणि १४ जुलै २०१७ द्वारे सर्व बँकांना निर्देशित केले आहे़ हे कर्ज वाटपासाठी ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंतची मुदत राहणार आहे़ छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार पात्र लाभार्थी पात्र राहतील असेही शासनाने सर्व संबंधित बँका व वित्तीय संस्थांना सूचित केले आहे़या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जास शासनाची हमी राहणार आहे़ असे दिले जाणारे कर्ज कर्जमाफी योजनेतील लाभ रकमेतून वसुलीस पात्र असणार आहे़ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी संबंधित बँकांशी संपर्क साधून कर्ज मिळवावे असे आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे़
शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे बँकांना आदेश
By admin | Updated: July 16, 2017 00:35 IST