औरंगाबाद : वक्फ बोर्डाची मालकी असलेल्या १४ कब्रस्तानांत रिलायन्स फोर-जी चे टॉवर उभारण्यासाठी परस्पर जागा देण्यात आली. त्या विरोधात बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद एजाज हुसैन यांनी अॅड. एस.एस. पटेल यांच्यामार्फत कोर्टात धाव घेतली होती. बोर्डाच्या याचिकेवर महाराष्ट्र वक्फ ट्रीब्युनलने ‘जैसे थे’ ठेवण्याचा निकाल दिला आहे. सिल्लेखाना, बायजीपुरा, शहानूरवाडी, कालाचबुतरा, क्रांतीचौक, किल्लेअर्क, चिकलठाणा, जामा मशीद, जाफरगेट, पडेगाव, नवखंड, मिटमिटा, गारखेडा या कब्रस्तानातील जागा फोर-जी साठी देण्याच्या ठरावाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पीआर कार्ड, वक्फच्या गॅझेटच्या आधारे याचिका दाखल केली होती. महापालिका स्थायी समितीने फेबु्रवारी २०१४ मध्ये शहरातील १२५ जागा रिलायन्स फोर-जी चे टॉवर उभारण्यासाठी भाड्याने देण्याचा ठराव ऐनवेळी मंजूर करून घेतला. तो ठराव २० मे रोजी सर्वसाधारण सभेने स्थगित केल्यानंतरही शहरात अनेक ठिकाणी टॉवरचे काम सुरू झाले आहे.
‘फोर-जी’साठी दिलेल्या जागेबाबत ‘जैसे थे’चे आदेश
By admin | Updated: June 27, 2014 01:03 IST