शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूच्या व्यसनाने मुखाचा कर्करोग; २५ टक्के रुग्णांच्या जिभेची पुनर्निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:42 IST

जागतिक तंबाखू विरोधी दिन विशेष:शासकीय कर्करोग रुग्णालयात अशा रुग्णांना शस्त्रक्रियेद्वारे नवी जीभ तयार करून दिली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर : तंबाखूच्या व्यसनामुळे मुखाच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते. मुख कॅन्सरने त्रस्त झालेल्या रुग्णांना अनेकदा जीभ काढावी लागते. त्यामुळे रुग्णास बोलणे, अन्न गिळणे या गोष्टी कठीण होतात. मात्र शासकीय कर्करोग रुग्णालयात अशा रुग्णांना शस्त्रक्रियेद्वारे नवी जीभ तयार करून दिली जात आहे. गेल्या वर्षभरात मुख कर्करोगाच्या २५ टक्के रुग्णांच्या जिभेची पुनर्निर्मिती करण्यात आली.

कर्करोग रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागात गेल्या वर्षभरात ३७०० रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील बहुतांश रुग्णांना तंबाखू, सिगारेटच्या व्यसनामुळे कर्करोगाला सामोरे जावे लागले. जीभ काढून टाकल्यानंतर त्याच्या हाताच्या, मांडीच्या त्वचेपासून व स्नायूपेशींपासून नव्याने जीभ घडविली गेली. अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांच्यासह कर्करोग शल्य चिकित्साशास्त्र विभाग, कान-नाक-घसा विभाग, प्लास्टिक सर्जरीचे डाॅक्टर्स, परिचारिका, कर्मचारी रुग्णसेवेसाठी परिश्रम घेतात.

वर्षभरातील स्थिती- कान-नाक-घसा विभागातील एकूण रुग्ण : ३,७००- नवे रुग्ण : १२००- वर्षभरात एकूण मोठ्या शस्त्रक्रिया : ८०- जिभेची पुनर्निर्मिती : २० रुग्ण

पहिल्या, दुसऱ्या स्टेजमध्येच शक्यपहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमधील मुख कर्करोगाचा रुग्ण असेल तरच जिभेची पुनर्रचना करता येते. ज्या रुग्णांना जिभेची अत्यावश्यकता असते, अशाच रुग्णांच्या जिभेची पुनर्रचना केली जाते.- डॉ. अजय बोराळकर, कर्करोग शल्य चिकित्साशास्त्र विभाग, कर्करोग रुग्णालय

मायक्रोसर्जरीची मदतजिभेची पुनर्रचना ही जिभेचे ट्यूमर काढल्यानंतर राहिलेल्या जिभेवर ठरते. उरलेली जीभ अर्ध्याहून जास्त असेल तर हातातून ज्याला ‘फ्री रेडियल फोरआर्म फ्लॅप’ म्हणतो, ते घेऊन जीभ तयार केली जाते. जर संपूर्ण जीभ काढावी लागली, तर मांडीमधून ‘फ्री एएलटी फ्लॅप’ घेतला जातो. या शस्त्रक्रियेमध्ये फ्लॅपमधील रक्तवाहिन्या मानेला असलेल्या रक्तवाहिन्यांशी मायक्रोसर्जरीच्या सहाय्याने जोडल्या जातात.- डॉ. चैतन्य पाटील, प्लास्टिक सर्जन, कर्करोग रुग्णालय

अन्न गिळणे, बोलणे सुसह्यजीभ तयार केल्यानंतर पूर्वीप्रमाणे स्पष्टपणे बोलता येत नाही. काही प्रमाणात बोलणे शक्य होते. शिवाय रुग्णाला अन्न गिळण्यासाठी नव्या जिभेची मदत होते. पूर्वी ४०-५० वर्षावरील मुखकर्करोगाचे रुग्ण येत, आता २८ वर्षाचा रुग्णही येतो. विभागप्रमुख डाॅ. सुनील देशमुख यांचे मार्गदर्शन मिळते.- डॉ. वसंत पवार, कान-नाक- घसा विभाग, कर्करोग रुग्णालय

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर