शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी; पिंक रिक्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 19:10 IST

संसाराचा गाडा नेटाने हाकणार; ६०० महिला पिंक रिक्षा चालवणार, अर्ज प्रक्रिया सुरू

छत्रपती संभाजीनगर : महिलांना रिक्षा व्यवसायासाठी अर्थसाह्य देणारी पिंक ई-रिक्षा योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगरमध्ये ६०० महिलांना पिंक रिक्षासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

या योजनेत रिक्षासाठी ७० टक्के कर्ज देण्यात येईल. २० टक्के रक्कम शासन देणार आहे आणि १० टक्के रक्कम ही अर्जदाराला प्रारंभी द्यावी लागणार आहे. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली आहे.

योजना काय आहे?योजनेचा उद्देश गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे करणे, हा आहे. महिलांना अत्याधुनिक ई-रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार असून, यामुळे चांगल्या उत्पन्नाचे साधन मिळेल.

योजना कोण राबवतेय?राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाद्वारे पिंक ई-रिक्षा योजना राबविली जात आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केला जात आहे.

निकष काय?पिंक ई-रिक्षा योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी काही महत्त्वाचे निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना प्राधान्य दिले जाईल. योजनेसाठी ३ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिला पात्र असतील.

ही कागदपत्रे लागणारआधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचा पुरावा आदी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहेत.

२० ते ४० वर्षांच्या महिला अर्ज करू शकणारया योजनेसाठी २० ते ४० वयोगटातील महिलांनाच अर्ज करण्याची संधी दिली जाईल. यामुळे युवती व मध्यमवयीन महिलांना नवी सुरुवात करण्याचा चांगला पर्याय मिळेल.

लाभार्थी महिलाच रिक्षा चालवणारयोजनेच्या लाभार्थी महिलांनाच ही ई-रिक्षा चालवणे बंधनकारक राहील. यासंदर्भात आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून वेळोवेळी तपासणी करून याची पडताळणी केली जाईल.

महिलांनी अर्ज करावापिंक ई-रिक्षा योजनेसाठी २० ते ४० वर्षांच्या महिलांनी अर्ज करावा. योजनेत लाभार्थी महिलांनाच ही रिक्षा चालविणे बंधनकारक असेल.- आर. एन. चिमंद्रे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRto officeआरटीओ ऑफीस