शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गुंठेवारीतील रहिवाशांना संधी; ग्रीन झोनमधील ७० ते ८० हजार बांधकामे होणार अधिकृत

By विकास राऊत | Updated: August 18, 2023 12:27 IST

‘ग्रीन’ झोनमध्ये असलेली ही बांधकामे ‘यलो’ झाेनमध्ये आणण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला असून यासाठी लवकरच गुंठेवारी कक्ष सुरू केला जाणार आहे

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागांमध्ये ‘ग्रीन’ झोनमध्ये झालेली सुमारे ७० ते ८० हजार बेकायदा बांधकामे गुंठेवारी अधिनियमांतर्गत नियमित करण्यात येणार आहेत.

‘ग्रीन’ झोनमध्ये असलेली ही बांधकामे ‘यलो’ झाेनमध्ये आणण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला असून यासाठी लवकरच गुंठेवारी कक्ष सुरू केला जाणार आहे. या वसाहतींमध्ये असलेली गुंठेवारी भागातील नागरिकांना बांधकामे नियमित करून घेण्याचे आवाहन केले जाईल. त्यानंतर बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश प्रशासकांनी गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रशासकांनी जरी सकारात्मकरीत्या बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय घेतला असला तरी नगररचना विभागातील काही जाणकारांच्या मते हे शक्य नसल्याचे बाेलले जात आहे.

प्रशासकांनी गुरुवारी पालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यात त्यांनी ‘ग्रीन’ झोनचे ‘यलो’ झोनमध्ये रूपांतर करताना कोणता भाग वगळला पाहिजे, याची विचारणा अधिकाऱ्यांकडे केली. त्यावर विमानतळ, संरक्षण विभागाशी संबंधित आरक्षणे वगळून इतर भाग ‘यलो’मध्ये रूपांतरित करता येऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नगररचना उपसंचालक मनोज गर्जे, डीपी युनिटचे प्रमुख रजा खान, विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे यांची बैठकीला उपस्थिती होती.

खाजगी एजन्सी नेमण्याचा विचार...कोणती बांधकामे वगळून नियमितीकरण करायचे, याचा ढोबळ आराखडा तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुंठेवारी भागातील मालमत्ताधारकांना जास्तीत जास्त बांधकामे नियमित करून घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. त्यानंतरही बेकायदा बांधकामे नियमित करून घेण्यास प्रतिसाद मिळत नसेल तर अशा मालमत्तांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत. कारवाईसाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश प्रशासकांनी गुरुवारच्या बैठकीत दिले.

गुंठेवारी वसाहतींमध्ये सुविधांची वानवा...गुंठेवारी वसाहतींतील २०२० पर्यंतची बांधकामे अधिकृत करण्याबाबतचा निर्णय झाला. त्यानंतर मनपाने नियमितीकरणाचे अभियान राबविले. त्याला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. सध्या गुंठेवारी वसाहतींमध्ये अजून सुविधांची वानवा आहे. एप्रिल २०२० पासून पालिकेवर प्रशासकराज आहे. बहुतांश वसाहतींमध्ये ८ ते १० दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. लोकप्रतिनिधींच्या फंडातून कामे होत असली तरी एनओसी देऊन मनपा प्रशासन मोकळे होत आहे. ती कामे कशी होत आहेत, त्याकडे प्रशासन काहीही लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका