शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दार उघड बये आता दार उघड; मंदिर खुले करण्याच्या मागणीसाठी भाजपचे शंखनाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 14:19 IST

आंदोलकांनी मंंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पोलीसांनी तो हाणून पाडला.

ठळक मुद्दे प्रवेशद्वारावरच आंदोलकांनी महाआरती केली. ठाकरे सरकारचा निषेध अशा घोषणा आंदोलनात देण्यात आल्या. 

औरंगाबाद: भाजपाने मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी गजानन महाराज मंदिरासमोर शंखनाद करून दार उघड बये आता दार उघड जयघोष करीत संबळ वाजविला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात गर्दी करू नका, असे केंद्र व राज्य शासन सांगत असतांना मंदिर खुले करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत भक्तीचे राजकारण रंगल्याचे यातून पाहायला मिळते आहे.

भाजपा शहरजिल्हा अध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी मंदिरे खुले करण्याच्या मागणीसाठी संत श्री गजानन महाराज मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. सरकारने जनतेच्या भावनेशी खेळ न करता धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. मंदिरावर अवलंबून असलेल्यांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध अशा घोषणा आंदोलनात देण्यात आल्या. आंदोलकांनी मंंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पोलीसांनी तो हाणून पाडला. प्रवेशद्वारावरच आंदोलकांनी महाआरती केली. प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रदेश सचिव प्रवीण घुगे, मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, अध्यात्मिक आघाडी मराठवाडा संयोजक संजय जोशी, राजेश मेहता, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेटे, अजय शिंदे, अरुण पालवे, प्रवीण कुलकर्णी, सविता कुलकर्णी, ताराचंद गायकवाड, मनीषा भन्साळी, अमृता पालोदकर, रामेश्वर भादवे, मनोज भारस्कर, मनीषा मुंडे, अशोक दामले, संतोष पाटील, संजय जोरले, दीपक बनकर, सागर पाले, गोविंद केंद्रे, दयाराम बसये, रामचंद्र नरोटे, मंगलमूर्ती शास्त्री आदींनी आंदोलनात सहभाग घेत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

मद्यालये सुरू आणि देवालये बंदप्रदेश सरचिटणीस आ.अतुल सावे म्हणाले, पूर्ण देशांत मंदिरे खुली केली आहेत. राज्यसरकारने मद्यालये खुली केले आहेत, आणि देवालये बंद ठेवली आहेत. जर श्री गणेशोत्सवापर्यंत मंदिर खुली करण्याचा निर्णय घेतला नाही, तर सर्व भक्तांना घेऊन कुलूपं तोडून मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा त्यांनी दिला. इतर धार्मिक स्थळे खुले आहेत, आणि फक्त मंदिरे बंद आहेत. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. वारकऱ्यांना सोबत घेऊन यापुढे आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा केणेकर यांना दिला.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनAurangabadऔरंगाबादAtul Saaveअतुल सावे