शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा रुग्णालयात लागते आग, तेव्हाच सरकारी यंत्रणेला जाग; अग्निशमनची ‘NOC’ घेण्याकडे रुग्णालयांची पाठ

By संतोष हिरेमठ | Updated: March 20, 2026 18:05 IST

छत्रपती संभाजीनगरात ८ वर्षांत अनेक घटना, शहरातील खासगी रुग्णालयांच्या फायर सेफ्टीचा प्रश्न ऐरणीवर

छत्रपती संभाजीनगर : ओडिशातील कटक येथील ट्रॉमा आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर रुग्णालयांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांनंतरच छत्रपती संभाजीनगरात प्रत्यक्षात उपाययोजना, खबरदारी घेण्यासाठी सरकारी यंत्रणेला जाग येत असल्याची स्थिती आहे.

जानेवारी २०२३ मध्ये भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात शिशु काळजी कक्षाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही शहरासह जिल्ह्यातील सरकारी व खासगी रुग्णालयांतील अग्निरोधक यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शहरात ५२६ खासगी रुग्णालये व ४५ बालरुग्णालये, अशा एकूण ५७१ रुग्णालयांना मनपाच्या आरोग्य विभागाने परवानगी दिलेली आहे. मात्र, तेव्हा केवळ १४६ रुग्णालयांनी ही एनओसी घेतलेली असल्याचे समोर आले होते. यातून उर्वरित ४२५ रुग्णालयांनी अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत असल्याची कागदपत्रे अग्निशमन विभागाला सादर केली नसल्याचे समोर आले होते. अनेक रुग्णालये आजही ‘एनओसी’ घेण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

खबरदारी, वेळोवेळी प्रशिक्षणजिल्ह्यातील ग्रामीण भागांतील रुग्णालयांना फायर ऑडिट करण्यासंदर्भात वेळावेळी सूचना दिल्या जातात. डाॅक्टर, कर्मचाऱ्यांना अग्निशमन विभागाकडून वेळावेळी प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये अशा १४ शासकीय संस्थांना अग्निशमन विभागाची ‘एनओसी’ प्राप्त आहे. त्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. ईलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करून देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला (विद्युत) कळविले आहे.- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक

विद्युत विभागाला सूचनारुग्णालयातील विविध विभागांमध्ये कुठे अतिरिक्त लोड येतो आहे का, वायरिंग किंवा उपकरणांमध्ये काही धोकादायक स्थिती आहे का, याची तपासणी करण्याच्या सूचना विद्युत विभागाला देण्यात आल्या आहेत. अग्निशमन सिलिंडरही ठिकठिकाणी आहेत.- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय

रुग्णालयांची तपासणी करणारखासगी रुग्णालयांची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. अग्निशमन सुविधा आहेत की नाही, यासंदर्भात पडताळणी केली जाईल.- अशोक खांडेकर, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

छत्रपती संभाजीनगरमधील यापूर्वीच्या घटना...- घाटीतील किचनमध्ये १७ ऑक्टोबर २०२० रोजी गुळाच्या भेलीच्या खोक्याला आग लागली होती.- २२ जून २०२१ रोजी घाटीतील प्रसूती कक्षाच्या परिसरातील जुन्या ‘एनआयसीयू’च्या प्रवेशद्वाराजवळच ईलेक्ट्रिक बोर्डमध्ये स्पार्किंग होऊन आग लागली होती. सुदैवाने या घटनेत १८ शिशू सुखरूप बचावले.- घाटीतील ‘आयसीसीयू’मध्ये असलेल्या एका ईलेक्ट्रिक बेडला २९ ऑगस्ट २०२३ रोजी मध्यरात्री आग लागली होती.- २१ एप्रिल २०२४ रोजी घाटीतील अपघात विभागावरील नर्सिंग होमच्या रूमला शाॅर्टसर्किटने आग लागली होती.- जानेवारी २०२५ मध्ये घाटीतील शस्त्रक्रियागृहात सिझेरियन प्रसूती सुरू असतानाच ऑक्सिजन सिस्टिमच्या अलार्म पॅनलला अचानक आग लागल्याची घटना घडली. परिचारिका, डाॅक्टरांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.- एप्रिल २०१८ मध्ये गारखेडा परिसरातील माणिक हॉस्पिटलमध्ये अचानक आग लागली. यावेळी येथील ३३ रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयांत हलविण्यात आले होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfireआगhospitalहॉस्पिटल