शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

३३ गावांसाठी एकच डॉक्टर !

By admin | Updated: July 30, 2014 01:03 IST

नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ गावांतील जनतेसाठी केवळ एकच डॉक्टर असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.

नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ गावांतील जनतेसाठी केवळ एकच डॉक्टर असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.नर्सी नामदेव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ गावच्या ५२ हजार लोकांच्या आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी नर्सी आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नियुक्ती होती. त्यापैकी डॉ. एस. पी. परदेशी यांची हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात २० जुलैला बदली झाली आहे. त्याच्या जागेवर नवीन डॉक्टरांची अद्याप नियुक्ती झालेली नाही. एकाच डॉक्टरवर लोकांचे आरोग्य अवलंबून राहिलेले आहे. नवीन डॉक्टरांची त्वरित नियुक्ती होणे गरजेचे आहे. ३३ गावांत कुठे आरोग्याचा साथरोगाची लागण झाल्यास अत्यंत बिकट परिस्थिती होईल.महिला डॉक्टरांचीही आवश्यकता३३ गावांमधून २४७१० महिलांच्या देखभालीसाठी महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे जरुरीचे आहे. बाळंतपण इतर समस्या जाणून घेण्यासाठी महिला डॉक्टरचीही गरज भासत आहे. दोन्ही बाबतचा विचार त्वरित करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.निवासाचा प्रश्न सुटला५ वर्षांपासून येथील डॉक्टरांना निवासस्थान नसल्याने अनेक समस्या उपस्थित होत्या; परंतु त्यांना राहण्यासाठी सुसज्ज इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही इमारत अद्याप ग्रामपंचायतच्या ताब्यात दिली नाही. याविषयी अधिक माहिती संबंधित यंत्रणेकडून घेतली असता या इमारतीचे काही कामे शिल्लक राहिलेली आहेत. हे काम त्वरित पूर्ण करून डॉक्टरांच्या राहण्याच्या उपयोगी पडावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. (वार्ताहर)