शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

केवळ वर्णनावरून पोलिसांनी काढला माग, सुपरवायझरला लुटणारे चौघे गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 18:36 IST

कामगारांचे वेतन करण्यासाठी जाणा-या एका कंपनीच्या सुपरवायझरवर चाकूहल्ला करून २ लाख ९५ हजार रुपये लुटणा-या चौघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देआरोपींकडून १ लाख ७५ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. या कामगिरीबद्दल आयुक्तांनी पोलिसांच्या पथकाला ३० हजार रुपये बक्षीस दिले.

औरंगाबाद: कामगारांचे वेतन करण्यासाठी जाणा-या एका कंपनीच्या सुपरवायझरवर चाकूहल्ला करून २ लाख ९५ हजार रुपये लुटणा-या चौघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या आरोपींकडून १ लाख ७५ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. या कामगिरीबद्दल आयुक्तांनी पोलिसांच्या पथकाला ३० हजार रुपये बक्षीस दिले.

लुटमारीचा कट रचणारा मुख्य आरोपी विष्णू सानप, सतीश पांडुरंग चव्हाण (१९,रा.जयभवानीनगर, वडगाव कोल्हाटी), महेश भाऊसाहेब वेताळ (रा.बालाजीनगर, रांजणगाव शे.पूं.) आणि एका विधीसंघर्षग्रस्त मुलाचा (अल्पवयीन) आरोपीमध्ये समावेश आहे. यातील विष्णू सानप याला डॉ. अनुपम टाकळकर यांना पिस्तूलचा धाक दाखवून २५ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी पकडले होते. या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर तो जेलमधून बाहेर आला होता.

याविषयी अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे म्हणाले की, वाळूज एमआयडीसीमधील अजिंक्य इंटरप्रायजेस या कंपनीच्या लेबर काँट्रक्टरकडे सुपवायझर असलेले दीपक रत्नाकर तौर हे १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कंपनीतील कामगारांचे वेतन करण्यासाठी रोख २ लाख ९५ हजार रुपये घेऊन दुचाकीने जात होते. यावेळी मराठवाडा अ‍ॅटो कंपनीमागील मोकळया जागेवर दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तौर यांना अडविले आणि अचानक त्यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांनी त्यांच्या गळ्यातील पैशाची बॅग हिसकावून नेली होती. 

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोहेकाँ वसंत शेळके, कारभारी देवरे, प्रकाश गायकवाड, मनमोहनमुरली कोलमी, बंडू गोरे, सुधीर सोनवणे यांनी तपास सुरू केला. 

वर्णनावरून संशयिताचे घर गाठणे अन..आरोपींच्या वर्णनावरून एका संशयिताचे पोलिसांनी घर गाठले तेव्हा संशयित घरी नव्हता. यावेळी त्याच्या आईने त्याला फोनवरून घरी पोलीस आल्याचे सांगताच त्याने मोबाईल बंद केला. यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. यानंतर त्याच्यासोबत कोण असते त्यांचा शोध घेतला असता अन्य तिन जणही घरातून गायब असल्याचे समोर आले. हिंगोली, वाशिम, परभणी आदी ठिकाणी संशयितांचा शोध घेतला. दरम्यान ते आज रांजणगाव येथे येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून पोलिसांनी तीन जणांना पकडले. त्यांच्याकडून रोख पावणे दोन लाखासह दुचाकी जप्त केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादvalujवाळूज