शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

अवघ्या ६ टक्के मालमत्तांमध्ये होतेय जलपुनर्भरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:32 IST

यंदाच्या उन्हाळ्यात तर तीव्र पाणीटंचाई जाणवूनही औरंगाबादकर मात्र जलपुनर्भरणाबाबत उदासीनच असल्याचे दिसून आले.

औरंगाबाद : पाणीटंचाईवर मात करण्याच्या पर्यायांपैकी सर्वोत्तम पर्याय म्हणजेच जलपुनर्भरण किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग होय. अनेक जलतज्ज्ञ याबाबत नेहमी माहिती देतात आणि पर्यावरणप्रेमीही पाणी वाचवा म्हणतानाच ‘पाणी जिरवा’ असे कटाक्षाने सांगतात. असे असतानाही आणि यंदाच्या उन्हाळ्यात तर तीव्र पाणीटंचाई जाणवूनही औरंगाबादकर मात्र जलपुनर्भरणाबाबत उदासीनच असल्याचे दिसून आले.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात जवळपास ३ लाख मालमत्ता आहेत. मात्र, आतापर्यंत यापैकी केवळ १८ ते २० हजार मालमत्तांमध्येच जलपुनर्भरण योजना राबविण्यात आली आहे. टक्केवारी काढल्यास हे प्रमाण अवघे ५ ते ६ टक्के असल्याचेच दिसून येते.

ज्या घरांमध्ये जलपुनर्भरण योजना सुरू करण्यात आली आहे, अशा लोकांना महानगरपालिकेकडून मालमत्ता करात १० टक्के कर सवलत मिळते. याशिवाय अनेक सामाजिक संघटना कमीत कमी पैसे घेऊन जलपुनर्भरण योजना बसवून देत आहेत. एकदा हा प्रकल्प घरात बसविला की, अनेक वर्षे यासाठी पुन्हा काहीही पैसा खर्च करावा लागत नाही; परंतु असे असतानाही जलपुनर्भरण करणाºया मालमत्तांची संख्या न वाढणे खेदजनक आहे.चौकट :जलपुनर्भरणाचे प्रमाण झाले कमीसकल मारवाडी मिडटाऊन महिला शाखेतर्फे मागील दोन वर्षांपासून जलपुनर्भरण उपक्रम राबविण्यात येतो. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर या ग्रुपकडून काम केले जात असल्यामुळे अत्यंत कमी किमतीत हे काम केले जाते. याविषयी गु्रपच्या सदस्या पूनम सारडा म्हणाल्या की, मागच्या वर्षी जवळपास २५० घरांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत हा उपक्रम सुरू करण्यात आला.

हे प्रमाण यावर्षी अत्यंत कमी झाले असून, यंदा अवघ्या ३० ते ३५ घरांमध्येच हा प्रकल्प सुरू करण्यात आला. कचरा प्रश्नाविषयी आता औरंगाबादकर जागरूक झाले आहेत; पण पाण्याच्या बाबतीत मात्र असूनही पाहिजे तेवढी जागरूकता आली नसल्याचेही सारडा यांनी सांगितले.

प्रीती भक्कड आणि भक्ती संकलेचा या ग्रुपच्या अध्यक्षा आणि उपाध्यक्षा असून जलपुर्नभरण या प्रकल्पासाठी सारडा यांच्यासह सुप्रिया सुराणा, भारती तोतला, अलका अग्रवाल प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी