शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

शहरातील १७ लाख नागरिकांसाठी हिवताप कर्मचारी १६५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 17:14 IST

मागील अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यातच आलेली नाहीत.

औरंगाबाद : डेंग्यूने शहरात सात जणांचा बळी घेतला. डेंग्यूचा थैमान नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत आहे. शहरातील तब्बल १७ लाख नागरिकांसाठी हिवताप विभागात केवळ १६५ कर्मचारी कार्यरत आहेत. मागील अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यातच आलेली नाहीत. विविध साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी हिवताप विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात साथरोगांनी डोके वर काढले. आता डेंग्यूने थैमान घातले आहे. महिनाभरात तब्बल सात जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत धूरफवारणी, औषधफवारणी, अ‍ॅबेट वाटप, नागरिकांमध्ये जनजागृती, आरोग्य तपासणी, कोरडा दिवस पाळणे आदी कामे करण्यात येतात. महापालिकेने अतिजोखमीच्या भागात विशेष मोहिमा सुरू केल्या आहेत. डेंग्यूवर पाहिजे तसे नियंत्रण अद्याप मिळालेले नाही. खाजगी रुग्णालये आजही हाऊसफुल आहेत. शहराची लोकसंख्या विचारात घेता मनपाच्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. महापालिकेच्या हिवताप विभागात केवळ १६५ कर्मचारी कार्यरत आहेत. १७ लाख लोकसंख्येसाठी ही कर्मचारी संख्या अपुरी आहे. 

तीन दशकांत ९७ पदे वाढली१९७८ मध्ये शासनाने शंभर टक्के अनुदानावर नागरी हिवताप योजना लागू केली. त्यात ६८ पदे मंजूर करण्यात आली. सध्या या विभागात १६५ कर्मचारी कार्यरत आहेत. मागील ३१ वर्षांत केवळ ९७ पदे वाढली आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य सांभाळताना आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे. 

आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त महापालिकेच्या आरोग्य विभागात सध्या जीवशास्त्रज्ञ, मलेरिया सुपरवायझर, कीटक संमाहरक या पदांवर एकही अधिकारी कार्यरत नाही. त्यामुळे या पदांसाठी पाठपुरावा सुरू आहे. 

नवीन आकृतिबंधात पदांची अपेक्षाजीवशास्त्रज्ञ ०१ आरोग्य सहायक १०कीटक संमाहरक ०४श्रेत्र कर्मचारी २०४वाहनचालक ०४मलेरिया पर्यवेक्षक ०३वरिष्ठ क्षेत्र कर्मचारी ६८

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdengueडेंग्यूHealthआरोग्यAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका