शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जुगारातही ऑनलाइनची चलती, सायबर पोलिसांच्या छाप्यात ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 13:32 IST

Cyber Crime in Aurangabad सिडकोत एन-५ येथे सुरू होता बिनबोभाट जुगार अड्डा 

औरंगाबाद : ऑनलाइन जुगार अड्ड्यावर सायबर गुन्हे शाखेने ( Cyber Crime In Aurangabad ) छापा मारून ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सिडको एन-५ येथे नाट्यगृहाच्या बाजूला सोमवारी केली.

सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, आठवडाभर पाळत ठेवून पथकाने छापा मारला. यात बाबासाहेब विठ्ठल खडके, दामोदर नारायण खडके, बंडू कचरू जौक, कृष्णा सुभाष डोंगरे, संतोष एकनाथ बनकर, प्रभाकर धोंडीबा भोसले, राजू गणपत पवार, ज्ञानेश्वर भाऊसाहेब साळुंके, विशाल सुभाष गोल्डे (रा.औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी ऑनलाइन लॉटरी खेळण्यासाठी बेकायदेशीररीत्या ऑनलाइन लॉटरी सेंटर चालू केले. फॅन्टसी ११ सॉप्टवेअर ॲप्लिकेशन व इनफिनिटीइमॅक्स कॉम या वेबसाइटचा वापर करून जुगार खेळविला. बाबासाहेब विठ्ठल खडके हा कृष्णा एजन्सी अशा नावाने बोर्ड लावून तो लॉटरी सेंटर चालवित होता. इतरांना तो ऑनलाइन पैसे पोहोचवित असे आणि सोमवारी त्याचा हिशोब करून पैसे जमा करून घेत होता. त्याच वेळी सायबर शाखेच्या पथकाने छापा मारून मुख्य सूत्रधारासह आरोपींना ताब्यात घेतले.

ऑनलाइन केले जाते ‘बॅलन्स’जुगार खेळणाऱ्यांच्या मोबाइलवर ऑनलाइन जुगार खेळविले जातात, त्यावेळी ही मंडळी मोबाइलवर ‘बॅलन्स’ मारून त्याचे रोख पैसेही वसूल करीत होते.

लेखी नोंदी आढळल्या ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांनी जुगार खेळणाऱ्यांच्या पैशाचा हिशोब ठेवण्यासाठी रजिस्टर व विविध प्रकारचे शिक्केही ठेवल्याचे आढळून आले. कोरे धनादेश, पावती बुक, स्टेशनरी इ. साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून रोख १७ लाख, पाच दुचाकी, दोन चारचाकी असा एकूण ४९,३५,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण, कविता तांबे, एकनाथ वारे, पोहेकॉ दुडकू खरे, संजय साबळे, प्रकाश काळे, सुशांत शेळके, गोकुळ कुतरवाडे, संदीप पाटील आदींचा पथकात सहभाग होता.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी