शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

ऑनलाइन शॉपिंग कायद्याच्या कक्षेत; ग्राहक तक्रार निवारण आयोग देईल न्याय,असा करा संपर्क

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 1, 2023 19:59 IST

ग्राहक तक्रार निवारण आयोग ‘तुम्हाला न्याय’ देण्यासाठी भक्कमपणे उभा

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन वस्तू खरेदी करताना डोळे झाकून खरेदी केली जाते. जेव्हा ग्राहकाला आपली फसवणूक झाली हे कळते तेव्हा कुठे तक्रार करावी या प्रश्नामुळे गोंधळ उडून जातो. आता ग्राहकांच्या पाठीशी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग ‘तुम्हाला न्याय’ देण्यासाठी भक्कमपणे उभा आहे. कारण, कायद्यानेच ग्राहकांना अधिकार मिळवून दिले आहे.

कायद्यानुसार ग्राहकांना ६ अधिकार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अंतर्गत ग्राहकांना हक्कांची हमी देण्यात आली आहे. १) सुरक्षिततेचा अधिकार २) माहिती मिळण्याचा अधिकार ३) निवडण्याचा अधिकार ४) ऐकण्याचा अधिकार ५) निवारण मागण्याचा अधिकार ६) ग्राहक जागृतीचा अधिकार.ऑनलाईन खरेदीत अनेक वेळा ग्राहकांची फसवणूक होते. ई-कॉमर्स कंपनी जाहिरातीमध्ये जशी वस्तू दिलेली असते, तशी वस्तू प्रत्यक्षात ग्राहकाला दिली जात नाही. एखाद्या वस्तूची मागणी केली असता त्यापेक्षा वेगळीच वस्तू दिली जाते. यामुळे आता ऑनलाइन खरेदीबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल करून ग्राहकांना न्याय घेता येणार आहे.

ऑनलाइन खरेदीत काय काळजी घ्यावी?१) वस्तू ज्या वेबसाइटवरून खरेदी केली त्या वेबसाइटच्या खालच्या बाजूस ‘व्हेरी साइन ट्रस्टेड’ असे प्रमाणपत्र आहे का हे तपासून पाहावे.२) नामवंत कंपन्यांच्या वेबसाइट अधिकृत आहेत याची शहानिशा संबंधित कंपनीच्या कॉल सेंटरवरून करावी.३) वस्तू खरेदी केल्यानंतर आर्थिक तपशील भरताना आपल्याच बँकेची अधिकृत वेबसाइट लिंक असेल तरच माहिती भरावी.४) ऑनलाइन आलेले पार्सल उघडताना त्याचा व्हिडीओ तयार करावा. ई-बिल तपासून पाहावे व जपून ठेवावे

आयोगाचे कार्यालय कुठे?ऑनलाइन खरेदीत ग्राहकांची फसवणूक झाली असेल त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये तक्रार करावी. हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात समोरील बाजूस आहे. तक्रार तुम्ही स्वत: दाखल करू शकता. यासाठी वकिलाची आवश्यकता नाही.

ई-कॉमर्स कंपनी विरोधात तक्रारी वाढल्याई-कॉमर्स कंपन्यांविरोधात कुठे तक्रार करणार याची माहिती अनेक ग्राहकांना नसल्याने ते फसवणूक होऊनही शांत बसतात. मात्र, ग्राहक तक्रार निवारण मंच अशा ग्राहकांना न्याय मिळवून देऊ शकते. यापूर्वीही ई-कॉमर्स कंपनी विरोधात निकाल देऊन ग्राहकांचे पैसे वसूल करून देण्यात आले आहे.- स्मिता कुलकर्णी माजी अध्यक्षा, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबाद