शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मांडूळ तस्करांचा ऑनलाईन फंडा फसला; व्हॉट्सॲपवरील छायाचित्रावरून सापडला पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 18:59 IST

Crime News मांडूळ विक्रीसाठी ग्राहक शोधत छायाचित्रे काही लोकांना व्हाॅट्सॲपवर पाठविले होते.

औरंगाबाद : ग्राहक शोधण्यासाठी व्हाॅट्सॲपवर मांडुळाचे छायाचित्र त्याने पाठवले. पोलिसांच्या खबऱ्याला हे छायाचित्र मिळताच त्याने मांडूळ तस्करांशी चार लाखात सौदा केला आणि मांडूळ घेऊन बोलवले. तो येताच पोलिसांनी त्याला मांडुळासह दर्श अमावस्येच्या रात्री अटक केली.

मनोहर नारायण भवरे (४७, रा. शास्त्रीनगर, गारखेडा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, शास्त्रीनगरात वॉचमन म्हणून काम करणारा मनोहर भवरे याने साथीदाराच्या मदतीने बिडकीन येथे मांडूळ पकडले. सुमारे दोन वर्षे वयाचे हे मांडूळ आहे. या मांडुळाला मोठी किंमत मिळते असे त्याला समजले होते. यामुळे भवरे आणि त्याचा साथीदार मांडूळ विक्रीसाठी ग्राहक शोधत होता. त्याने मांडुळाची छायाचित्रे काही लोकांना पाठविले होते. याविषयीची माहिती खबऱ्याने सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना दिली. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी एका पोलिसाला ग्राहक म्हणून भवरेशी संपर्क साधायला लावला. भवरेने त्यांच्याही व्हॉट्सॲपवर मांडुळाचे छायाचित्र पाठविले आणि सौदा करण्यास सांगितले. भवरेने ४ लाखांत मांडूळ विक्री करण्याची तयारी दर्शविली. त्याला मांडूळ घेऊन विशालनगर येथे बोलावून घेतले. तो मांडूळ घेऊन येताच पोलिसांनी त्याला पकडले. आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्याच्याकडून जप्त केलेले मांडूळ वनविभागाच्या ताब्यात दिल्याचे स.पो.नि. सोनवणे यांनी सांगितले.

गुप्तधन काढण्यासाठी मांत्रिकाकडून मांडुळाला मागणीगुप्तधन काढण्यासाठी आणि जादूटोणा करणारे लोक मांडुळाचा वापर करतात. मांडूळ गुप्तधन शोधण्यासाठी महत्त्वाचे काम करते असा मांत्रिकांचा समज असतो. यामुळे मांत्रिक मांडूळ खरेदी करतात, असे म्हटले जाते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद