शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परीक्षा, छोटीशीही चूक पडेल महागात, काय काळजी घ्याल?

By संतोष हिरेमठ | Updated: January 23, 2024 16:26 IST

राज्यभरात १४ जून २०२१ रोजी लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन चाचणी देण्याची सुविधा सुरू झाली.

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात न जाताही आता अगदी घरी बसल्या बसल्या ऑनलाइन परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स मिळविता येत आहे. त्यामुळे अनेक कटकटींपासून उमेदवारांची सुटका झाली आहे. परंतु ऑनलाइन परीक्षा देताना इकडे तिकडे पाहिले तर निकाल राखीव ठेवला जातो. पुन्हा अर्ज करून परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे ही परीक्षा देताना थोडी काळजी घेतलेली बरी.

राज्यभरात १४ जून २०२१ रोजी लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन चाचणी देण्याची सुविधा सुरू झाली. परंतु नियमांना फाटा देत पैसे उकळून लर्निंग लायसन्स देण्याचा उद्योग काही जणांनी सुरू केला होता. हा प्रकार ‘लोकमत’ने ‘कागदपत्रे व्हाॅट्सॲप करा अन् लायसन्स मिळवा’, ‘८०० रुपये द्या, लगेच लायसन्स घ्या’, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून समोर आणला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन परिवहन विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर लर्निंग लायसन्ससाठी करण्याचा निर्णय घेतला आणि आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ पद्धतीने विविध सेवा देण्यास सुरुवात झाली.

लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परीक्षालर्निंग लायसन्सच्या परीक्षेसाठी वेब कॅमेरा सुरू केल्यानंतर आधार कार्डवरील उमेदवाराला ओळखूनच चाचणी सुरू होते. चेहऱ्याची मूळ ठेवण जुळल्यानंतरच चाचणी देता येते. त्यामुळे डमी उमेदवाराला परीक्षा देता येत नाही.

दररोज अनेक जण देतात परीक्षाकाही दिवसांपासून अगदी घरी बसून परीक्षा देता येत असल्याने ऑनलाइन चाचणी देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आरटीओ कार्यालयात न येता सहजपणे लर्निंग लायसन्स मिळते.

नापास होण्याची कारणे काय?घर बसल्या ऑनलाइन परीक्षा देताना इकडे तिकडे पाहिल्यास, म्हणजे स्क्रीनवरून नजर हटल्यास, परीक्षा देणाऱ्याच्या पाठीमागून इतर कोणी गेल्यास निकालच जाहीर केला जात नाही. त्यामुळे पुन्हा परीक्षा द्यावी लागते. वाहतूक नियमांचा अभ्यास नसेल तरीही उमेदवार नापास होतात.

ऑनलाइन परीक्षेसाठी...सारथी परिवहन संकेतस्थळावरून लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज करून, विहित शुल्क भरून परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स मिळविता येते. १५ प्रश्नांपैकी किमान ९ प्रश्नांची उत्तरे बरोबर असावीत.

परीक्षा देताना काय काळजी घ्याल?आधार कार्डवरील फोटो अपडेट करून घ्यावा. चेहरा जुळला नाही तर परीक्षा देता येत नाही. परीक्षेदरम्यान इकडे तिकडे पाहू नये. मागून कोणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादonlineऑनलाइन