शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एक कर्मचारी छत्रपती संभाजीनगरातील ४५० चौकांमधील वाहतूक कोंडी सोडवू शकतो; पण...

By मुजीब देवणीकर | Updated: December 18, 2023 19:01 IST

स्मार्ट सिटीने लावलेल्या सीसीटीव्ही पोलवरच स्पीकर्स बसविण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटी प्रशासनाने जवळपास १७५ कोटी रुपये खर्च करून शहरात ७५० सीसीटीव्ही, ४५० चौकांमध्ये अत्याधुनिक स्पीकर्स बसविले. मात्र, मागील वर्षभरापासून स्पीकर्सचा अजिबात वापर होत नाही. पोलिस आयुक्तालय, स्मार्ट सिटीच्या कमांड सेंटरमध्ये बसून केवळ एक कर्मचारी सारी वाहतूक कोंडी सोडवू शकतो.

शहरातील प्रमुख चौकांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. चारचाकी वाहनधारक, दुचाकीस्वार, रिक्षा चालक रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. वाहनधारकांना अनावश्यक वाहतूक कोंडीत वेळ घालवावा लागतो. वाहतूक सुरळीत राहावी, शहरातील कायदा सुव्यवस्थेला मदत व्हावी या हेतूने सेफ सिटीअंतर्गत सीसीटीव्ही प्रकल्प चार वर्षांपूर्वी हाती घेण्यात आला. हा प्रकल्प पूर्णही झाला. विविध गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्ही मोलाची भूमिका बजावत आहेत. मुख्य रस्त्यांवर मंगळसूत्र चोरीच्या घटनाही यामुळेच कमी झाल्या आहेत. स्मार्ट सिटीने शहरात जेथे सीसीटीव्ही बसविले, त्यातील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ४०० रस्त्यांची निवड करण्यात आली. या ठिकाणी मोठे ४५० स्पीकर्स बसविण्यात आले आहेत. शहरात आणीबाणीची परिस्थिती असेल तर नागरिकांना सूचना देण्यासाठी महागडे स्पीकर्स बसविण्यात आले आहेत.

दोन कमांड सेंटरसीसीटीव्ही, स्पीकर्स नियंत्रणाचे अधिकार पोलिस आयुक्तालय आणि स्मार्ट सिटीतील कमांड सेंटरला देण्यात आले आहेत. कमांड सेंटरमधून एक कर्मचारी सीसीटीव्ही पाहून रस्त्यात उभी असलेली रिक्षा पटकन काढा, अशी सूचना केल्यानंतर वाहनधारक पटकन वाहन काढून घेतात. अत्यंत प्रभावी असलेली ही यंत्रणा वापरली जात नाही.

पोलिस वापर करतातपोलिस आयुक्तालयातील कमांड सेंटरमधून सीसीटीव्ही बघून स्पीकर्सवर वारंवार सूचना दिली जाते. एखाद्याने वाहन बाजूला न केल्यास त्याच्या वाहनांच्या नंबरची नोंद केली जाते. जिथे सूचना दिली, त्याची नोंदही एका रजिस्टरमध्ये केली जात आहे.- फैज अली, प्रोजेक्ट मॅनेजर आयटी, स्मार्ट सिटी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTrafficवाहतूक कोंडी