शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘चेक बाऊन्स’ झाल्यास दीड हजार दंड; महावितरणचा ग्राहकांना झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 20:06 IST

वीजग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड आकारला जात होता. 

औरंगाबाद : वीज दरवाढीनंतर आता वीजबिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाऊन्स) झाल्यास ३५० रुपयांऐवजी दीड हजार रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने ग्राहकांंना दिलेला दुसरा झटका आहे. 

वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला असून १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणीही सुरू केली आहे. औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत जवळपास ९ हजार लघुदाब वीजग्राहक हे दरमहा धनादेशाद्वारे वीज बिल भरणा करतात; परंतु यातील सुमारे साडेतीनशे धनादेश दरमहा विविध कारणांमुळे बाऊन्स होत आहेत. त्यासाठी वीजग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड आकारला जात होता. 

वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी ग्राहकांनी दिलेला धनादेश वटणे आवश्यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद महामंडळाच्या दप्तरी होते; परंतु अनेक वीजग्राहक हे अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीज बिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास तीन ते चार दिवस लागू शकतात. त्यामुळे मुदतीनंतर वीज बिलाचा भरणा झाल्यास  ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात येते .

ग्राहकांचा कल वाढतोय आॅनलाईन पेमेंटकडेअलीकडच्या काळात आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळांतर्गत सध्या जवळपास दीड लाख वीजग्राहक हे धनादेशाऐवजी दरमहा सुमारे ३० कोटी रुपयांचा वीज बिलाचा भरणा इंटरनेट तसेच मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून करीत आहेत. 

टॅग्स :electricityवीजbillबिलMONEYपैसा