शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

एक विभाग इकडे तर दुसरा विभाग तिकडे; छत्रपती संभाजीनगरची जिल्हा परिषद विस्कळीत

By स. सो. खंडाळकर | Updated: September 4, 2025 19:55 IST

कामानिमित्त आलेल्यांना कोणता विभाग कुठे आहे, याचा शोध घेत फिरावे लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगपुरा येथील मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे जि.प.चे कार्यालय नव्या इमारतीच्या बांधकामापासून विस्कळीत झाले आहे. जिल्हा परिषदेंतर्गत चालणारे विविध विभाग एक इकडे तर एक तिकडे आहे. त्यामुळे या मिनी मंत्रालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मात्र पुरती गैरसोय होत आहे.

दरम्यान, नवी इमारत बांधून पूर्ण झाली. पण, इमारतीतील विद्युत पुरवठा, फर्निचर व अन्य कामे प्रलंबित आहेत. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध नाही. तो जेव्हा केला जाईल, तेव्हाच ही कामे हाती घेतली जातील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सारे विभाग या नव्या विभागात कधी कार्यरत होतील, हे सांगणे अशक्य आहे. तोपर्यंत विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना अनेक गैरसोयींना सामाेरे जावे लागणार, हे उघड आहे. त्यात त्यांचा वेळ व पैसा वाया जाणार आहे. शिवाय विभाग एकाच छताखाली नसल्याने त्यावर नियंत्रण ठेवणेे देखील अवघड जात आहे.

कुठला विभाग कुठे?१) आरोग्य विभाग : आरोग्य उपसंचालक कार्यालय, बाबा पंप२) शिक्षण विभाग माध्यमिक व प्राथमिक : चेलीपुरा हायस्कूल, स्टेशन रोड३) पंचायत विभाग : डीआरडीए टाईप निवासस्थान-अ-८, अ-९ पानचक्की रोड४) समाजकल्याण विभाग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा५) पशुसंवर्धन विभाग : डीआरडीएच्या बाजूला, घाटी हॉस्पिटलसमोर६) कृषी विभाग : सामाजिक न्याय विभाग, खोकडपुरा७) पाणीपुरवठा विभाग : जिल्हा परिषद कन्या प्रशाला इमारतीच्या बाजूला८) यांत्रिकी विभाग : जि.प. कन्या प्रशाला, औरंगपुरा९) स्वच्छ भारत मिशन : नारळीबाग१०) वेतन, वेतन पडताळणी व गट विमा योजना : नारळीबाग निवासस्थान११) महिला व बालकल्याण, सीईओंचे दालन, डेप्युटी सीईओंचे दालन, वित्त विभाग, बांधकाम विभाग, सिंचन विभाग, अध्यक्ष, उपाध्यक्ष व विविध समित्यांचे दालन हे जि.प.तच आहेत.

यामुळे कामानिमित्त आलेल्यांना कोणता विभाग कुठे आहे, याचा शोध घेत फिरावे लागत आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरzpजिल्हा परिषद