शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

एक लाख अंगणवाडी बालकांचे ‘आधार’ रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 5:16 AM

महिला व बालकल्याण विभागाने महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील ९७ अंगणवाडी पर्यवेक्षिकांना ‘टॅब’ दिले.

- विजय सरवदे औरंगाबाद : महिला व बालकल्याण विभागाने महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील ९७ अंगणवाडी पर्यवेक्षिकांना ‘टॅब’ दिले. ‘फिंगर प्रिंट’ यंत्रही दिले; परंतु केवळ अधिकृत आधार कार्ड आॅपरेटर’ म्हणून त्यांना मान्यता न मिळाल्यामुळे महिनाभरापासून एकाही बालकाचे आधार कार्ड निघू शकलेले नाही. जिल्ह्यात सुमारे १ लाख ३० हजार बालकांची आधार कार्ड नोंदणी रखडली आहे.

अंगणवाडीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बालकांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्याची जबाबदारी पर्यवेक्षिकांवर सोपविण्यात आली आहे. अधिकृत आॅपरेटर होण्यासाठी आधार कार्ड प्रादेशिक कार्यालयाकडून परीक्षा घेतली जाते. ती उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आॅपरेटरचा कोड मिळतो. त्यामुळे थेट आधार कार्ड कार्यालयाशी ‘लिंक’ होऊन कार्ड नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येते.जिल्ह्यात ३ हजार ५०६ अंगणवाड्या असून, त्यामध्ये २ लाख २८ हजार बालकांची नोंदणी झालेली आहे. बोगस लाभार्थींना आळा बसविण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने १ एप्रिलपासून लाभार्थींची आधार नोंदणी आवश्यक केली आहे.

आठवडाभरात परीक्षाजिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास अधिकारी मिरकले म्हणाले की, अधिकृत आॅपरेटरसाठीची परीक्षा आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शुल्काचे चलनदेखील महिला व बालकल्याण विभागाने आधार कार्ड प्रादेशिक कार्यालयाकडे भरले आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्रfundsनिधी