टेम्पो-दुचाकीच्या अपघातात एक जण ठार

By Admin | Updated: November 16, 2016 03:03 IST2016-11-16T03:03:29+5:302016-11-16T03:03:29+5:30

पिंपळगाव सिद्धनाथ येथे मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास टेम्पो व दुचाकीची जोरदार धडक झाली.

One killed in tempo-bike accident | टेम्पो-दुचाकीच्या अपघातात एक जण ठार

टेम्पो-दुचाकीच्या अपघातात एक जण ठार

जुन्नर : पिंपळगाव सिद्धनाथ येथे मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास टेम्पो व दुचाकीची जोरदार
धडक झाली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. याबाबत कानू गवारी यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शंकर अरविंद रेंगडे (वय ३५, रा. गोद्रे, जुन्नर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गणेशखिंडीकडून येणारा टेम्पो (एमएच ४६ - एआर ४५४४) व त्यांची दुचाकी यांची जोरदार धडक झाली. टेम्पोचालक विपुल चिलप यास जुन्नर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे तपास करीत आहेत.

Web Title: One killed in tempo-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.