शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

एकीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दुसरीसोबतच केला विवाह; नर्सने इजेक्शन घेऊन संपवलं जीवन

By राम शिनगारे | Updated: May 3, 2023 19:46 IST

बेगमपुरा पोलिस ठाण्यात ब्रदरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटीत) नर्स युवतीला ब्रदरने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाच्या अमिषाने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला सोडून देत दुसरीसोबतच विवाह केला. त्यामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या युवतीने राहत्या घरातील टाॅयलेटमध्ये विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. हा प्रकार १ मेच्या रात्री घडला. या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात ब्रदरच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

कल्पना विठ्ठलराव जाधव (३०, रा. नांदेड, ह.मु.मोहिणी अपार्टमेंट, जयसिंगपुरा) असे आत्महत्या केलेल्या नर्सचे, तर ज्ञानेश्वर किसन पवार (३६, रा. घाटी दवाखाना) असे आरोपी ब्रदरचे नाव आहे. बेगमपुरा पोलिस ठाण्यात मृत कल्पनाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार २०१६ पासून कल्पना घाटीमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती. २६ एप्रिल रोजी ती गावी नांदेडला आली. तेथून ३० एप्रिलला कामावर रुजू झाली. १ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मृताची आई व भाऊ तिच्या जयसिंगपुरा येथील फ्लॅटवर आले. त्याठिकाणी तिघांनी गप्पा मारल्या. काही वेळाने कल्पना टॉयलेटला गेली. त्याचकालावधीत दोघांना झोप लागली. 

दरम्यान, फिर्यादीची दुसरी मुलगी घरी आली. तेव्हा भावाने दरवाजा उघडला. त्यानंतर आई, भाऊ आणि बहिण बोलत असतानाच त्यांनी कल्पना आणखी टॉयलेटमधून बाहेर कशी आली नाही, अशी विचारणा केली. तिच्या मोबाईलवर फोन लावला असता, तो बाहेरच होता. त्यानंतर तिघांनी टाॅयलेटचा दरवाजा तोडला. तेव्हा कल्पनाने हाताला इंजेक्शन टोचल्याचे दिसून आले. तिला बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ज्ञानेश्वर पवारच्या विरोधात नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक साधना आढाव करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद