शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये नाल्यात बुडून एकाचा मृत्यू; मनपा उपायुक्त निलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:06 IST

शहरातील जयभवानी नगर भागात काल रात्री १०. १५ वाजेच्या सुमारास एकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्दे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांना निलंबित केले. 

औरंगाबाद : शहरातील जयभवानी नगर भागात काल रात्री १०. १५ वाजेच्या सुमारास एकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांना निलंबित केले. 

मंगळवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या दरम्यान जयभवानी नगर येथे राहणारे भगवान निवृत्ती मोरे (५०) हे दुध घेऊन घराकडे जात होते. यावेळी रस्त्यातील नाला पावसाच्या पाण्यामुळे ओव्हर फ्लो होऊन वाहत होता. पावसामुळे मोरे यांना नाला न दिसल्याने ते त्यात पडले. नाल्याच्या पाईपमध्ये अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, या भागात नाल्यावर लोकांनी अतिक्रमण केलंय. ती तोडण्याबाबत महापालिका प्रशासनाने उदासीनता दाखवल्याने निष्पाप नागरिकाचा बळी गेला असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मोरे हे मुळचे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पवनी येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले ,१ मुलगी असा परिवार आहे. 

उपायुक्तांना केले निलंबित या भागात काही दिवसांपूर्वी अतिक्रमण तोडण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे हे अतिक्रमण तोडून तसेच अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले. त्याच खड्ड्यात पडून भगवान मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून ही नाल्यावरील अतिक्रमणं हटविण्याची मागणी स्थानिक नगरसेवक आणि नागरिक करत होते. मात्र महापालिका प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. या घटनेनंतर मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांना निलंबित केले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादDeathमृत्यू