शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

एक कोटी देऊन भागीदारी घेतलेल्यास बनावट कागदपत्रांद्वारे काढले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:01 IST

सुरुवातीला दोन वर्षे जाधव दाम्पत्याने कैलेवाड यांना नफा दाखविला. त्यानंतर मात्र जाधव दाम्पत्य त्यांच्या हिश्श्याची ५० टक्के  रक्कम कंपनीत गुंतवणूक करीत नसल्याचे कैलेवाड यांना समजले.

ठळक मुद्देभागीदाराशी जाधव याचा वाद झाल्याने २०१३ मध्ये जाधवने त्यांना काढून टाकले. त्याच्या जागेवर कैलेवाड यांना कंपनीत भागीदार होण्याविषयी विचारले. 

औरंगाबाद : एक कोटी रुपये घेऊन कंपनीत भागीदार केलेल्या व्यापाऱ्याला बनावट कागदपत्रांआधारे भागीदारीतून हटविण्यात आल्याचे समोर आले.  याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून उद्योजक दाम्पत्याविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला. प्रकाश जाधव आणि स्वाती जाधव, असे गुन्हा नोंद झालेल्या  दाम्पत्याचे नाव आहे.  

आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारदार पांडुरंग बाळासाहेब कैलेवाड (३६, रा. गुरुप्रसादनगर) आणि प्रकाश जाधव यांचे मूळ गाव परभणी जिल्ह्यातील असल्याने त्यांच्यात जुनी ओळख आहे. जाधव याची शेंद्रा एमआयडीसीमध्ये जे.एम. कास्ट नावाची कंपनी आहे. या कंपनीतील भागीदाराशी जाधव याचा वाद झाल्याने २०१३ मध्ये जाधवने त्यांना काढून टाकले. त्याच्या जागेवर कैलेवाड यांना कंपनीत भागीदार होण्याविषयी विचारले. 

जाधव याच्या सांगण्यानुसार कैलेवाड यांनी हैदराबादेतील मित्र मनीष खुशालचंद चौधरी याच्याकडून एक कोटी रुपये हातउसने मागितले. ही रक्कम कैलेवाड यांच्या सांगण्यावरून चौधरी यांनी स्वाती जाधवच्या बँक खात्यावर आरटीजीएसने जमा केली. यानंतर भागीदारीच्या भारतीय अधिनियम-१९३२ कलम ४ नुसार कैलेवाड यांचा ई-फॉर्म भरण्यात आला. तेव्हापासून कैलेवाड हे जाधवच्या कंपनीचे ५० टक्के  भागीदार झाले. 

स्वाती जाधव आणि कैलेवाड यांच्या नावाचे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये संयुक्त चालू खाते उघडले. कंपनीचा आर्थिक व्यवहार जाधव दाम्पत्य पाहत होते. त्यांच्यासोबत घरगुती संबंध असल्याने विश्वासाने कंपनीचा व्यवहार जाधव दाम्पत्यावर सोपविला होता. कंपनीतून मिळणाऱ्या नफ्यातील पन्नास टक्के हिस्सा कंपनीत गुंतविण्याचे ठरले होते. सुरुवातीला दोन वर्षे जाधव दाम्पत्याने कैलेवाड यांना नफा दाखविला. त्यानंतर मात्र जाधव दाम्पत्य त्यांच्या हिश्श्याची ५० टक्के  रक्कम कंपनीत गुंतवणूक करीत नसल्याचे कैलेवाड यांना समजले. म्हणून जून २०१७ मध्ये त्यांनी कंपनी स्वत:च्या नावे करण्याचा आग्रह धरला. त्यावरून कैलेवाड आणि जाधव दाम्पत्यात खटके उडू लागले. त्यानंतर कैलेवाड यांनी १३ आॅक्टोबर २०१७ रोजी बँकेला पत्र देऊन त्यांचे संयुक्त बँक खाते गोठविले. जाधव दाम्पत्याने देवगिरी नागरी सहकारी बँकेत खाते उघडून व्यवहार सुरू केला.

फॉर्मवर केल्या बनावट सह्याजाधव दाम्पत्याने कैलेवाड यांच्याशी झालेली भागीदारी मोडीत काढून त्यांच्या जागेवर मुलगा प्रभंजन जाधव याला कंपनीत नवा भागीदार म्हणून घेतल्याची माहिती कैलेवाड यांना समजली. त्यानंतर त्यांनी सहकार निबंधक भागीदारी संस्था यांच्या कार्यालयातून त्यांच्या कंपनीविषयी कागदपत्रे मिळविली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. जाधव दाम्पत्याने कैलेवाड यांच्या स्वाक्षरीचे अधिकारपत्र चार्टर्ड अकाऊंटंटला दिल्याचे भासविले. हा प्रकार समजल्यानंतर कैलेवाड यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे जाधव दाम्पत्याविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी तक्रारीची चौकशी केल्यानंतर मंगळवारी याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक नवले गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

टॅग्स :fraudधोकेबाजीMONEYपैसाbusinessव्यवसायPoliceपोलिस