शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या दिवशीही सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरूच

By बापू सोळुंके | Updated: May 4, 2023 19:36 IST

मराठा आरक्षणाची मागणी: विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलकांशी घेतली भेट

छत्रपती संभाजीनगर : मराठा  आणि ओबीसीमध्ये असलेले कुणबी मराठा एकच असून मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी १ मे पासून सकल मराठा समाजाने क्रांतीचौकात सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज चौथ्या दिवशीही ४ मे रोजी सुरू होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गुरूवारी सकल मराठा समाजाच्या आंदोलकाची घेतली भेट घेतली.

पश्चिम महाराष्ट्रातील दोन-तीन जिल्हे वगळता अन्य राज्यभरातील मराठा समाजाला कुणबी मराठा हे ओबीसीचे प्रमाणपत्र दिले जाते. राज्यसरकारने नेमलेल्या विविध आयेाग आणि समित्यांनी कुणबी मराठा आणि मराठा समाज एकच असल्याचा आणि मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल दिलेला आहे. तरीही सुद्धा मराठा समाजाला आरक्षणापासून वंचीत का  ठेवलं जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत ४३ बांधवांनी आत्मबलिदान दिले. तसेच ५८ मोर्चे काढण्यात आले होते. यानंतर २०१९मध्ये तत्कालीन राज्यसरकारने दिलेले एसईबीसी हे आरक्षण सर्वेाच्च न्यायालयाने रद्द केले. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश हाच अंतिम पर्याय आहे, असे नमूद करीत प्रा.चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सतीश वेताळ, रेखा वाहटूळे, दिव्या पाटील,सुकन्या भोसले, मनोज गायके, रविंद्र वाहटूळे आदींसह मराठा कार्यकर्त्यांनी १ मे पासून क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

५ मे रोजी आत्मदहनाचा इशारा१ मे पासून सुरू केलेल्या आंदोलनाची राज्यसरकारने दखल घेतली नाही. यामुळे संतप्त महिला आंदोलकांनी  ५ मे रोजी आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसेच शिंदे फडणवीस सरकार टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जात आहे परंतु मराठा आरक्षणासाठी ते काहीही करत नसल्याचा आरोप आंदोलकानी लावला.

मराठा आरक्षणावर सरकारचा वेळकाढूपणा- अंबादास दानवेसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर. शिंदे - फडणवीस सरकार फक्त वेळ काढू पणा करत असल्याचा आरोप आ. अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.  ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळू नाही अशी केंद्र आणि राज्य सरकारची भावना आहेत. फडणवीस  यांनी विरोधी विरोधी पक्षात असताना आमचे सरकार आल्याबरोबर मराठा मराठा समाजाला आरक्षण दिले, जाईल असे म्हटले होते, ते आश्वासन त्यांनी पाळले नसल्याचा आरोप दानवेंनी केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवे