शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एमआयएम’मध्ये माजी नगरसेवकांचा बंडाचा झेंडा! 

By मुजीब देवणीकर | Updated: April 20, 2024 11:46 IST

नेत्यांकडून मनधरणी सुरू; एकाचा राजीनामा, अन्य आठ तयारीत

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षात सर्व काही आलबेल नाही. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील नऊ माजी नगरसेवकांनी बंडाचा झेंडा उंचावला. त्यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली असून, डॅमेज कंट्रोलसाठी स्थानिक नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बंडखोरीच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांसोबत चर्चा सुरू केली. मात्र, अद्याप यश आलेले नाही. पुढील काही दिवसांत आम्ही अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यातील एका बंडखोराने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

२०१५ मध्ये पहिल्यांदाच एमआयएम पक्षाने महापालिकेची निवडणूक लढविली. अपेक्षेपेक्षा जास्त यश पक्षाला मिळाले. २२ पेक्षा अधिक नगरसेवक एकाच वेळी निवडून आले. शिवसेना-भाजपा युतीसमोर विरोधी पक्ष म्हणून एमआयएमला संधी प्राप्त झाली. २०२० मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपला. मागील चार वर्षांमध्ये काही माजी नगरसेवकांना पक्षात अजिबात किंमत मिळत नव्हती. पक्षाच्या बैठका, कार्यक्रमांनाही त्यांना निमंत्रण देण्यात येत नव्हते. वेळोवेळी अपमानास्पद वागणूक मिळू लागली. आगामी मनपा निवडणुकीत त्यांना तिकीटही मिळणार नाही, अशी चर्चा उघडपणे पक्षातील नेते करू लागले. 

ज्या वॉर्डातून हे नगरसेवक निवडून आले, त्या वॉर्डातील अन्य इच्छुकांना दिवसभर आपल्यासोबत स्थानिक नेते ठेवू लागले. त्यामुळे ९ नगरसेवकांनी ऐन निवडणुकीसमोर बंडाचा झेंडा उंचावला. त्यामुळे पक्षात खळबळ उडाली. बंडखोरीच्या तयारीत असलेल्या ९ पैकी भडकलगेटचे माजी नगरसेवक गंगाधर ढगे यांनी मागील आठवड्यातच पक्षाचा राजीनामा दिला. अन्य आठ जणांच्या गुप्त बैठका सध्या सुरू असून, लवकरच ते अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

जाहीर सभेला गैरहजेरीचार दिवसांपूर्वी पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची शहागंज येथे जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला पूर्व विधानसभा मतदारसंघातील बहुतांश नगरसेवक गैरहजर होते. त्यांना अद्याप लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेश स्थानिक नेत्यांकडून मिळालेले नाहीत. त्यामुळे या भागातील नगरसेवक ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत.

पक्षात सर्व काही सुरळीतपक्षात सर्व काही सुरळीत असून, कोणीही बंड केलेले नाही. विरोधकांकडून असे चित्र निर्माण करण्यात येत आहे. एखाद्या नगरसेवकाने राजीनामा सादर केला तर बंड म्हणता येईल. आतापर्यंत पक्षाकडे काेणीही अशा पद्धतीची नाराजीही दर्शविलेली नाही. बंड नाही, उलट सर्व माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या कामात रात्रंदिवस व्यस्त आहेत.- शहारेख नक्षबंदी, शहराध्यक्ष एमआयएम.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन