शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नव्या अभ्यासक्रमाच्या पेपरला जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका; दीड तास चालला गोंधळ

By राम शिनगारे | Updated: April 4, 2024 11:08 IST

सुधारित प्रश्नपत्रिका पाठवल्यानंतर झाली परीक्षा

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयात बी. काॅम. अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राच्या द्वितीय भाषा हिंदी विषयाच्या नवीन अभ्यासक्रमाचा पेपर बुधवारी सकाळी १० वाजता होता. या पेपरला हिंदी द्वितीय भाषा विषयाच्या जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याचा प्रकार घडला. विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरूवात केल्यानंतर जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका आल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा एकच धावपळ सुरू झाली. विविध महाविद्यालयांतून परीक्षा विभागाला कळविण्यात आले. दीड तासांच्या गोंधळानंतर नव्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका केंद्रांवर पाठविण्यात आली. त्यानंतर पेपर सुरळीतपणे पार पडल्याची माहिती महाविद्यालयातून देण्यात आली.

विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना मंगळवारपासून सुरूवात झाली. बुधवारी बी. कॉम. प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या द्वितीय भाषा हिंदी विषयाचा पॅटर्न-२०२२ या अभ्यासक्रमाचा पेपर सकाळी १० वाजता होता. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने जुन्या अभ्यासक्रमांची म्हणजेच पॅटर्न-२०१८ कोड क्र. २०१६ ही प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पाठवली. त्याच प्रश्नपत्रिकेवर पॅटर्न-२०२२ असेही लिहिण्यात आले होते. मात्र, परीक्षेला सुरूवात होताच विद्यार्थ्यांना प्रश्नांमध्ये बदल झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ या विषयाच्या प्राध्यापकांना कळवले. त्यानंतर अर्ध्या तासातच परीक्षा विभागाने झालेली चूक मान्य करत काही वेळातच नवीन पॅटर्न-२०२२ या अभ्यासक्रमाचा पेपर पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार ११:३० वाजता नवीन अभ्यासक्रमाचा पेपर संबंधितांना मिळाला. त्यानंतर ११:३० ते १:३० यावेळेत परीक्षा सुरळीतपणे पार पडली.

पेपर सेटरचा निष्काळजीपणाविषयाच्या प्रश्नपत्रिका सेट करताना त्यावर ओल्ड, न्यू अभ्यासक्रम असे स्पष्टपणे लिहावे लागते. मात्र, द्वितीय भाषा हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेवर पॅटर्न-२०१८, पॅटर्न-२०२२ असे लिहिलेले नव्हते. त्यामुळे परीक्षा विभागाकडून प्रश्नपत्रिका पाठवली गेली.

दुरुस्त प्रश्नपत्रिका पाठविण्यात आलीहिंदी विषयाची पॅटर्न-२०१८ व पॅटर्न-२०२२ या दोन्ही अभ्यासक्रमांच्या विषयाचे नाव व अभ्यासक्रम एकच असल्यामुळे सर्व संबंधित परीक्षा केंद्रांना प्रश्नपत्रिका पाठवली होती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी पॅटर्नचा अभ्यासक्रम वेगळा असल्याचे कळवल्यानंतर संबंधितांना दुरुस्त प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. या प्रकरणात झालेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाढीव वेळ दिला. परीक्षा सुरळीत पार पडली.- डॉ. भावना गवळी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद