शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

दारु पिताना जुने वाद उफाळून आले; संतापात तरुणाची चाकू खुपसून हत्या

By सुमित डोळे | Updated: March 27, 2024 19:47 IST

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एकाचा शोध सुरू आहे

छत्रपती संभाजीनगर : दारु पिताना जुने वाद उफाळून आल्याने  चिकलठाणा केंब्रिज रस्त्यावर चेतन संजय गिरी (२३, रा. चिकलठाणा) या तरुणाची क्रुर हत्या करण्यात आली. मंगळवारी मध्यरात्री २ वाजता हि घटना घडली. मित्रांसोबतच्याच जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.

एमआयडिसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन त्याचा मित्र अमोल ताठे सोबत दारु पिण्यासाठी गेला होता. रात्री १ वाजता चिकलठाण्यात राहणारा नवनाथ दहिहंडेने संपर्क करुन त्यांना जाऊन भेटला. तिघांनी पुन्हा सोबत दारु पिणे सुरू केले. मात्र, जुन्या वादातून दहिहंडे व चेतन मध्ये वाद सुरू झाले. अमोल त्यांना समजून सांगत होता. मात्र, त्यांच्यात चांगलीच धक्काबुक्की झाली. दहिहंडेने शांत होण्याचे नाटक करत छावणीतील विनोद सुर्यवंशी व पवन मिसाळला कॉल करुन दारु पित असलेल्या ठिकाणी बोलावून घेतले. 

पाचही जणांनी पुन्हा सोबत दारु पिण्यास सुरूवात केली. मात्र, त्यांच्यात वाद पुन्हा वाद पेटले. काही क्षणात वाद टोकाला गेले व दोन वाजेच्या सुमारास पवन, विनोद व दहिहंडे ने चेतनला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तेवढ्यात विनोदने कंबरेत लपवलेला धारधार चाकू काढून थेट चेतनच्या पोटात खुपसला. चेतन क्षणार्धात रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. अमोलने त्याला वाचवण्यासाठी धाव घेताच झटापटीत त्याला पाठीत चाकू लागला. त्यानंतर विनोद व पवनने दुचाकीवरुन पळ काढला. तर अमोलने मित्रांना संपर्क करुन चेतनला जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत चेतनचा मृत्यू झालेला होता. 

तीन वाजेच्या सुमारास घटनेची माहिती कळताच एमआयडिसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी धाव घेतली. घटना समजून घेत त्यांनी तत्काळ आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले. अंमलदाप प्रकाश घुगे यांच्यासह अंमलदार प्रकाश सोनवणे, संतोष सोनवणे यांनी सूत्र हलवत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दहिहंडे  व मिसाळला ताब्यात घेतले. तर सायंकाळी उशिरापर्यंत विनोदचा शोध सुरू होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी