शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! आता गावातही होणार कचरा संकलन, बचत गट घेणार जबाबदारी

By विजय सरवदे | Updated: November 25, 2023 19:24 IST

पहिल्या टप्प्यात जि.प. राबविणार ७७ गावांत उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : शहराप्रमाणे आता गावेही स्वच्छ दिसावीत, या दिशेने जिल्हा परिषदेने पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यात ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७७ गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून बचतगटांच्या माध्यमातून घरोघरी जावून कचरा संकलित केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतींच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेसोबत लवकरच करार केला जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी विकस मीना यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प.तील स्वच्छ भारत मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले व त्यांची टीम परिश्रम घेत आहे. गावात रस्त्यावर अथवा मोकळ्या जागेत कचरा विखुरलेला असतो. सांडपाणी रस्त्यावर पसरलेले असते. त्यामुळे अनेकदा डास, माशा, चिलटे, अळ्यांमुळे आरोग्याची समस्या उद्भवते. गावेही स्वच्छ झाली पाहिजेत. तिथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, या हेतूने स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ भारत मिशन कक्षाने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर दिला आहे. सांडपाणी व्यवस्थापनावर बऱ्यापैकी कामे सुरू आहेत. पण, गावातील कचरा इकडे- तिकडे न टाकता तो एकाच ठिकाणी जमा व्हावा व त्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. कचरा संकलित करतानाच ओला व सुका असे वर्गीकरण केले जाईल. १५ डिसेंबरपर्यंत हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावात तो राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी सांगितले.

बचत गट करतील कचरा जमाजिल्ह्यात ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७७ गावांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन संकलित केला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत कचरा विलगीकरण शेड उभारले जाणार असून या शेडमध्ये पाच हौद असतील. त्यात काच, रबर, प्लास्टिक, मेडिकल वेस्ट (सॅनिटेरी नॅपकीन वैगरे) व अन्य असे कचऱ्याचे वर्गीकरण करून टाकला जाईल. तो कचरा मनपाच्या प्रक्रिया सेंटरपर्यंत नेण्याचे कामही ग्रामपंचायतीला करावे लागणार आहे. यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी सातत्याने बैठका घेऊन ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामसेवकांची मानसिकता तयार केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद