शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

बापरे, दर चार दिवसांत तिघींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर; घाबरू नका, उपचार शक्य

By संतोष हिरेमठ | Updated: January 9, 2026 18:05 IST

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जागरूकता महिना विशेष; खासगीत लस, ‘सरकारी’त प्रतीक्षाच

छत्रपती संभाजीनगर : शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) दर चार दिवसांत तीन महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे निदान होत आहे. एकीकडे आकडे धडकी भरवणारे असले तरी दुसरीकडे हा कर्करोग वेळेवर ओळखला तर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. प्रतिबंधात्मक लसही आली आहे. मात्र ही लस सध्या खासगी रुग्णालयातच उपलब्ध असून, सरकारी रुग्णालयात मिळण्याची प्रतीक्षाच आहे.

दरवर्षी जानेवारी हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करणारा महिना म्हणून साजरा होतो. महिलांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करणे हाच या आजाराविरोधातील सर्वात मोठा उपाय असल्याचे आरोग्य यंत्रणा सांगत आहे. रुग्णाच्या उपचारासाठी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री कर्करोग विभागप्रमुख डॉ. अर्चना राठोड, किरणोपचारशास्त्र विभागप्रमुख डाॅ. बालाजी शेवाळकर आदी प्रयत्नशील आहेत.

वर्षभरात किती रुग्ण?शासकीय कर्करोग रुग्णालयात २०२५ मध्ये २८६ महिलांना गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे निदान झाले. यात तिसऱ्या, चौथ्या स्टेजमध्ये येणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक आहे.

हा कर्करोग होण्याची कारणे...- ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा या कर्करोगाचा सर्वात मोठा कारणीभूत घटक आहे.- वैयक्तिक शारीरिक स्वच्छता राखण्यास अडचण.- दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर.- कमकुवत रोगप्रतिकारशक्ती.- तंबाखूचे सेवन.- नियमित आरोग्य तपासणीचा अभाव.- असुरक्षित लैंगिक संबंध. कमी वयात लग्न.- कुपोषण.

टाळता येणारा कर्करोगहा टाळता येणारा कर्करोग आहे. ९ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलींचे एचपीव्ही लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक महिलेने वयाच्या ३० वर्षांपासून वर्षातून एकदा चाळणी परीक्षण शासकीय रुग्णालयात करून घ्यायला हवे. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.- डॉ. अर्चना राठोड, स्त्री कर्करोग विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय

महिलांची स्क्रीनिंगभारतात गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांमधील दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. केंद्र सरकारने ९ ते १४ वयोगटातील मुलींना ‘एचपीव्ही’ लस मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय आरोग्य मोहिमेंतर्गत ३५ वर्षांवरील महिलांची तपासणी (स्क्रीनिंग) होत आहे.- डाॅ. अपर्णा राऊळ, अध्यक्ष, सर्व्हाईकल कॅन्सर अवरनेस कमिटी- ‘आयएमए’

प्रशिक्षण पूर्ण, लवकरच लस‘एचपीव्ही’ लसीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. लवकरच ही लस उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येईल. त्यानंतर ९ ते १४ वर्षांच्या मुलींना दिली जाईल.- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Cervical Cancer Cases Rising: Early Detection and Prevention are Crucial

Web Summary : Cervical cancer diagnoses are increasing, but early detection is key. HPV vaccination, especially for young girls, and regular screenings are vital for prevention. The HPV vaccine will soon be available in government hospitals. Awareness and proactive health checks are crucial.
टॅग्स :cancerकर्करोगchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर