शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराची ३० लाखाची फसवणूक, बिल्डरसह तीन जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 19:01 IST

अर्धवट बांधकाम झालेले फ्लॅट दाखवत विश्वास संपादन केला

ठळक मुद्देकाही रोख रक्कम आणि बांधकाम साहित्याची मदत म्हणून केली मागणी

औरंगाबाद: फ्लॅटचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यासाठी अर्थसहाय्य करा आणि फ्लॅट विक्रीतून येणारा नफा तुम्हाला देतो,असे सांगून कंत्राटदाराची तब्बल ३० लाखाची फसवणुक करण्यात आल्याचे समोर आले.  याविषयी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात बिल्डर आणि त्याच्या दोन साथीदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

मनोज हुकूमचंद चांदिवाल(४६,रा. सह्याद्री हिल, गारखेडा), अमीत अरविंद धारूरकर (४७,रा. ज्योतीनगर) आणि बिल्डर प्रफुल्ल माधवराव मांडे( सिडको एन-४)अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील रहिवासी सचिन रमनलाल कासलीवाल हे सरकारी कंत्राटदार आहेत. २०१७ मध्ये त्यांची आरोपी मनोज चांदीवालसोबत ओळख झाली होती. त्यानंतर काही दिवसानंतर मनोजने त्यांची आरोपी अमीत आणि बिल्डर मांडे यांच्यासोबत भेट करून दिली होती. बिल्डर मांडे यांच्या विविध बांधकामाच्या साईट्स पैशाअभावी बंद पडल्याचे सांगितले. काही फ्लॅटचे किरकोळ बांधकाम केल्यानंतर त्यांची विक्री होणार आहे. या बांधकामासाठी तुम्ही आम्हाला ३० लाख रुपये दिले तर फ्लॅट विक्र ीनंतर तुम्हाला ४० लाख रुपये परत करतो, असे सांगितले. कासलीवाल यांचा विश्वास बसावा याकरीता आरोपींनी विविध ठिकाणच्या बांधकाम साईटवर नेवून अर्धवट बांधकाम झालेले फ्लॅट दाखविले.  

आरोपींवर विश्वास बसल्याने कासलीवाल यांनी त्यांना ७ लाख रुपये रोख आणि  २० लाख रुपये किमतीचे बांधकाम साहित्य खरेदी करून दिले. शिवाय अन्य किरकोळ कामासाठी आणखी तीन लाख रुपये दिले. यानंतर आरोपींनी त्यांच्या फ्लॅटचे बांधकाम पूर्ण केले आणि ते फ्लॅट विक्री केले. मात्र ठरल्यानुसार त्यांनी कासलीवाल यांना ४० लाख रुपये परत केले नाही. सुरवातील काही दिवस त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून पैसे पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे मुद्दल रक्कम परत करण्याचे सांगितले.

धनादेश केला अनादरकासलीवाल यांच्याकडून पैशासाठी तगादा सुरू होताच आरोपींनी प्रथमेश कन्स्ट्रक्शन कंपनीचा १७ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश त्यांना  दिला. हा धनादेश कासलीवाल यांनी बँकेत वटविण्यासाठी टाकला. मात्र तत्पूर्वीच आरोपींनी बँकेला पत्र देवून तो धनादेश वटवू नका,असे कळविले. यामुळे बँकेने धनादेश न वटताच परत केला. आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच कासलीवाल यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.  पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे तपास करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस