शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य; ‘त्या’ व्हॅनचालक, रिक्षाचालकाचे लायसन्स, परमिट होणार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:39 IST

शहरात गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या घटनेत दोन विद्यार्थिनींसोबत व्हॅनचालक आणि रिक्षाचालकाने अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य करणारे व्हॅनचालक आणि रिक्षाचालकाचे लायसन्स आणि परमिट रद्द करण्यात येणार आहे. दोघांना नोटीस देऊन ही प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.

शहरात गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या घटनेत दोन विद्यार्थिनींसोबत व्हॅनचालक आणि रिक्षाचालकाने अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत दोन्ही चालकांचे लायसन्स आणि परमिट रद्द करण्याची कारवाई करण्याचा निर्णय आरटीओ कार्यालयाने घेतला आहे.

पालकांनो, ही घ्या काळजी- वाहन आणि चालकाची पार्श्वभूमी तपासा.- वाहनाचा परवाना आणि ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहे का, याची खात्री करा.- चालकाने पोलिस व्हेरिफिकेशन केलेले आहे का ते तपासा.- वाहन शाळेने अधिकृतरित्या नियुक्त केले आहे का, याची माहिती घ्यावी.- वाहनाची माहिती जवळ ठेवा.- वाहनाचा नंबर, ड्रायव्हरचा मोबाइल नंबर आणि मार्गाची माहिती ठेवावी.- मुलांना दररोज वाहनातील परिस्थितीबद्दल विचारपूस करावी.- काही अडचण, अस्वस्थता, गैरवर्तन झाले असेल, तर मुलांनी ते खुलेपणाने सांगावे, यासाठी विश्वासाचे वातावरण तयार करावे.- मुलींना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्व-संरक्षण प्रशिक्षण दिले जावे.- मुलांना शक्यतो गटाने किंवा परिचित विद्यार्थ्यांसोबत प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करावे.- एकटी विद्यार्थिनी पाठवण्याऐवजी इतरांसोबत बसवण्याची व्यवस्था करावी.- जीपीएस ट्रॅकिंग असलेले वाहन निवडा.- मुलगी अचानक गप्प गप्प होणे, घाबरणे, रडणे किंवा शाळेला जाण्यास टाळाटाळ करणे, याकडे वेळीच लक्ष द्यावे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी