शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

'मराठवाड्यातील मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण हक्काचे'; न्यायालयात याचिका प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 18:30 IST

मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा याकरिता चार वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे.

ठळक मुद्देघटनेच्या कलम ३७१ उपकलमाद्वारे एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात समावेश होणाऱ्या प्रांतातील नागरिकांना घटनात्मक सरंक्षण दिले आहे. त्यानुसार सध्या कर्नाटकमध्ये असलेल्या बेळगांव, कारवार, निपाणी येथील मराठा समाज कर्नाटक राज्यात ओबीसी आहे.

औरंगाबाद: मराठवाड्यातील मराठा समाजाला त्यांच्या हक्काच्या ओबीसी आरक्षणापासून शासनाने वंचित ठेवले. शासनाने आरक्षणाची मर्यादा तातडीने वाढवून मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा याकरिता चार वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेत शासनाला म्हणणे मांडण्यास सांगितले होते. या याचिकेची मराठा समाजाला माहिती देण्यासाठी आम्ही ७ जूनपासून मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती याचिकाकर्ते किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चव्हाण म्हणाले की,  हैदराबाद स्टेट मधील मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला.  तेव्हा आंध्रप्रदेश सरकारने मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण दिले. घटनेच्या कलम ३७१ उपकलमाद्वारे एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात समावेश होणाऱ्या प्रांतातील नागरिकांना घटनात्मक सरंक्षण दिले आहे. त्यानुसार सध्या कर्नाटकमध्ये असलेल्या बेळगांव, कारवार, निपाणी येथील मराठा समाज कर्नाटक राज्यात ओबीसी आहे. महाराष्ट्रात विनाअट सामील झालेल्या मराठवाड्यातील मराठ समाजाचा राज्यसरकारने ओबीसीमध्ये समावेश करणे गरजेचे होते. परंतु, आजपर्यंत शासनाने मराठा समाजाला हक्कापासून वंचित ठेवले आहे. शासनाला हा निर्णय घेण्यास सांगावा, यासाठी ही याचिका सर्व पुराव्यासह न्यायालयांत आहे. हे आरक्षण मिळविताना ओबीसी बांधवावर अन्याय होऊ नये याकरिता केंद्रसरकारने स्वतंत्र दुरुस्ती  बील आणून आरक्षणाची मर्यादा ५० टक्केपेक्षा अधिक करावी.  मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाजातील तरुण वैफल्यग्रस्त झाले. आता सर्व मार्ग बंद झाली असा त्यांचा समज दूर करण्यासाठी आणि या याचिकेची माहिती त्यांना देण्यासाठी ७ जूनपासून मराठवाड्याचा दौरा करीत असल्याचे चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. यावेळी परमेश्वर नलावडे, योगेशकेवारे, डॉ. उध्दव काळे, अशोक वाघ आणि गणेश पाटील वीर उपस्थित होते. 

या आहेत मागण्या केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयांत दाखल केलेल्या पुनर्याचिकेसोबत आरक्षणाची मर्यादा वाढविणारा वटहुकूम काढावा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून राज्यसरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करुन शिक्षण आणि नोकरीतील अनुशेष भरावा, आदी मागण्या त्यांनी केल्या.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ