शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आता पर्मनंट लायसन्सच्या ‘टेस्ट’वर राहील ‘सेन्सर’ची नजर; अशी असेल नवीन चाचणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:33 IST

ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक होणार, निविदा प्रक्रिया सुरू

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात पर्मनंट लायसन्सची चाचणी काहीशी कठीण होणार आहे. एखाद्या छोट्या चुकीमुळेही पर्मनंट लायसन्सपासून वाहनचालक वंचित राहू शकतो. कारण लवकरच आरटीओ कार्यालयाच्या करोडी येथील जागेत ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक (एडीटीटी) होणार आहे.

सध्या करोडी येथील जागेत पर्मनंट लायसन्ससाठी चाचणी घेतली जाते. मात्र, याठिकाणी सध्या कोणताही टेस्टिंग ट्रॅक नाही. मातीच्या ट्रॅकवरच दुचाकी, चारचाकी चालवून दाखवावी लागते. मात्र, लवकरच याठिकाणी अत्याधुनिक असा टेस्टिंग ट्रॅक होणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

कशी असेल नवीन चाचणी?- ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक (एडीटीटी) : ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञान-आधारित चाचणी प्रणाली असेल. यामध्ये मानवी हस्तक्षेपाशिवाय उमेदवाराच्या वाहन चालन कौशल्याचे मूल्यमापन केले जाणार आहे.- सेन्सर आणि कॅमेरा आधारित तपासणी : या ट्रॅकवर विविध सेन्सर्स आणि कॅमेरे लावलेले असतील. ते उमेदवाराच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवतील. यात ‘एच’ ट्रॅक, इंग्रजी अंकातील ‘8’ हा ट्रॅक, समांतर पार्किंग आणि चढावर वाहन थांबवून पुन्हा पुढे नेणे यांसारख्या कौशल्यांची चाचणी घेतली जाईल- चाचणी अधिक कडक : चाचणीत पारदर्शकता आणण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरते. लहानशा चुकीसाठीही गुण कमी होतील. त्यामुळे वाहनचालकांची चाचणी अधिक कडक होणार आहे.- त्वरित अहवाल : चाचणी पूर्ण होताच त्वरित आणि अचूक अहवाल तयार होईल. उमेदवार चाचणीत पास झाला की अनुत्तीर्ण झाला, याची माहिती तात्काळ मिळेल.- एकाच वेळी अनेकांच्या चाचणी : एकाच वेळी अनेक उमेदवारांची चाचणी घेऊन जलद सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यातून वेटिंग कमी होण्यास मदत होईल.

यंत्र, सेन्सरच्या मदतीने ड्रायव्हिंग टेस्टकरोडी येथील जागेत ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक (एडीटीटी) होईल. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. यंत्रावर आधारित, सेन्सरच्या मदतीने ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल.- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर