शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आता सेवा सोसायट्याही सुरू करणार पूरक व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:25 IST

आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे धोरण : पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ९० संस्थांची निवड

रऊफ शेखफुलंब्री : शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या खरेदी-विक्री संघ व विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलली असून, या संस्था पूरक व्यवसाय सुरू करणार आहेत. यासाठी सहकारी विकास महामंडळे व काही वित्तीय संस्था कर्जरूपी मदत करतील. औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ९० संस्था यात भाग घेणार आहेत.ग्रामीण भागात असेलल्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्या या गाव विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. यात केवळ शेतकºयांच्या हितासाठी कामकाज होते; परंतु गेल्या काही वर्षांपासून या सहकार संस्थांकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. परिणामी, सहकार संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्या आहेत. शिवाय सोसायटीमधील कार्यरत गटसचिवांचीही वाताहत सुरू असल्याने याचा फटका शेतकºयांना बसत आहे. याला संस्था चालविणारे संचालक मंडळ व सरकार जबाबदार आहे.शासनाच्या नवीन धोरणामुळे आशा वाढल्याराज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने काढलेल्या नवीन आदेशानुसार या संस्था सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा, तालुका व गाव पातळीवर कार्यक्रम घेतले जात आहेत. या संदर्भात शेतकºयांना त्यांच्या गावात जाऊन सहकार विभाग माहिती देताना दिसत आहे. शासनाच्या या नवीन धोरणामुळे सहकार संस्था सक्षम होतील, अशी आशा आहे.१०० टक्के सभासद करणारसहकार संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रथम गावातील सर्व शेतकºयांना सभासद करून घेतले जाणार आहे. त्यांच्यासाठी केवळ दोनशे रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. ही प्रक्रिया प्रत्येक तालुका सहायक निबंधकांकडून सुरू करण्यात आलेली आहे. येत्या वर्षभरात सर्व शेतकरी सहकार संस्थांशी जोडले जातील. प्रत्येक शेतकºयाने आपला व्यवहार संस्थेच्या माध्यमातून करावा, जेणेकरून शेतकरी व संस्था दोघांना याचा लाभ होण्यास मदत होणार आहे.दोन कंपन्या सहभागीशासनाच्या धोरणाला दोन वस्तू उत्पादन कंपन्यांनी सहमती दिली आहे. या कंपन्या आपली विविध प्रकारची उत्पादने सहकारी संस्थांमार्फत माफक दरात विक्री करणार असल्याने याचा फायदा शेतकरी व सहकारी संस्थांना होणार आहे.पहिल्या टप्प्यात ९० संस्था सहभागीसहकार संस्था सक्षमीकरण योजनेत औरंगाबाद जिल्ह्यातील ९० सहकारी सोसायट्या विविध प्रकारचे पूरक व्यवसाय सुरू करणार आहेत. यात रासायनिक, जैविक खतांची विक्री, पशुखाद्य विक्री, कापड विक्री, गांडूळ खत विक्री, तांदूळ विक्री, चहा पावडर विक्री, कृषी औजारे, स्टेशनरी दुकान, पिठाची गिरणी, ट्रॅक्टर भाड्याने देणे, कृषी मालावर प्रक्रिया करून पॅकेजिंग करून विक्री करणे आदी पूरक व्यवसायांचा समावेश आहे. ज्या ९० संस्थांनी यात भाग घेतला त्यातील काही संस्थांनी अनेक व्यवसाय सुरूही केले असून उर्वरित संस्था लवकरच व्यवसाय सुरू करणार आहेत. पूरक व्यवसायामुळे शेतकºयांसह संस्था, सोसायट्या सक्षम होऊन त्यांची आर्थिक भरभराट होण्यास मदत होणार आहे, असे सहायक निबंधक परमेश्वर वरखडे यांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकFarmerशेतकरी