शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आता वाहन उचलण्यापूर्वी पोलीस देणार भोंग्याद्वारे इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 19:27 IST

वाहतूक शाखेचे पोलीस आता रस्त्यावरील दुचाकी उचलण्यापूर्वी वाहनधारकांंना भोंग्याद्वारे इशारा देत आहेत. 

ठळक मुद्देरस्त्यावरील दुचाकी उचलण्यासाठी येणाऱ्या पोलिसांच्या वाहनांवर असे भोंगे लावण्यात आले आहेत

औरंगाबाद : रस्त्यावरील दुचाकी उचलून नेण्याच्या वाहतूक पोलिसांच्या मनमानी पद्धतीवर ‘लोकमत’ने २८ मे रोजी वृत्त प्रसिद्ध करून प्रकाश टाकला होता. या वृत्ताची दखल घेत वाहतूक शाखेचे पोलीस आता रस्त्यावरील दुचाकी उचलण्यापूर्वी वाहनधारकांंना भोंग्याद्वारे इशारा देत आहेत. 

रस्त्यावरील दुचाकी उचलण्यासाठी येणाऱ्या पोलिसांच्या वाहनांवर असे भोंगे लावण्यात आले असून, याद्वारे पोलीस ‘रस्त्यावरील वाहने उचला, अन्यथा ती उचलून नेण्यात येतील’ अशा प्रकारचा इशारा देताना दिसत आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी कारकडे दुर्लक्ष करून वाहतूक पोलीस दुचाकींना लक्ष्य करीत असतात. वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी वाहने रस्त्यावरून हटविणे एवढा एकमेव उद्देश वाहतूक पोलिसांचा असणे आवश्यक आहे. असे असताना वाहतूक पोलीस मात्र दुचाकी उचलून नेण्याच्या नावाखाली केवळ महसूल जमा करण्यातच व्यस्त असल्याचे चित्र शहरात आहे. पोलिसांची दुचाकी उचलण्याची पद्धत चुकीची असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. या वृत्तात दुचाकी उचलण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी अनाऊन्सिंग (भोंग्याद्वारे इशारा) करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. 

या वृत्ताची गंभीर दखल वाहतूक विभागाने घेतली आणि रस्त्यावरील वाहने उचलून ज्या वाहनातून नेण्यात येतात, त्या वाहनांना पोलिसांनी प्रत्येकी दोन भोंगे लावले. शिवाय प्रत्येक वाहनातील वाहतूक पोलीस माईकवरून रस्त्यावरील वाहने काढण्याचे आवाहन नागरिकांना करताना दिसत आहेत. वाहतूक पोलिसांचे वाहन येताच नागरिक रस्त्यावरील त्यांचे वाहन काढून घेतात. जे नागरिक वाहने काढत नाहीत, त्यांची वाहने उचलून नेण्याचे काम मात्र पोलीस करीत असतात.

आता लक्ष्य चारचाकी वाहनेरस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे शहरातील अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. विशेषत: निराला बाजार, उस्मानपुरा, क्रांतीचौक, पैठणगेट, औरंगपुरा, टीव्ही सेंटर ते जळगाव रोड या भागात रस्त्यावर लावलेल्या दुचाकीसह चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. आता वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर अडथळा ठरणारी चारचाकी वाहनेही उचलण्याचे काम बुधवारपासून चालू केले आहे. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसtraffic policeवाहतूक पोलीसtwo wheelerटू व्हीलर