शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

आता चातुर्मासात करा बिनधान्स लग्न; पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ लग्नतिथी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 22, 2023 15:22 IST

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांसाठी आनंदाची बातमी

छत्रपती संभाजीनगर : गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नवरदेव-नवरीसाठी पंचांगकर्त्यांनी आता आनंदाची बातमी दिली आहे. अहो, यंदा लग्नतिथी कमी असली, तरी चिंता करू नका... कारण अधिकमास-चातुर्मास काळातही तुम्हाला लग्न करता येणार आहे. त्यासाठी दिवाळीनंतर तुळशीच्या विवाहाची वाट पाहावी लागणार नाही. एप्रिल ते नोव्हेंबरच्या दरम्यान आपत्कालीन ३७ लग्नतिथी देण्यात आल्या आहेत. मग उडू द्या लग्नाचा बार...

मुख्य काळातील लग्नतिथी :मे २०२३ :- २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२,२९, २९, ३०.जून :- १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २६, २७. २८.डिसेंबर :- ६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१.--------------------------------गौणकाल व आपत्कालीन लग्न मुहूर्तएप्रिल - १५, २३, २४, २९, ३०.जून - ३०,जुलै - १, २, ४, ५, ९, १०, ११, १४.ऑगस्ट - २२, २६, २८,२९.सप्टेंबर - ३, ६, ७, ८, १७, २४, २६.ऑक्टोबर - १६, २०, २२. २३, २४, २६.नोव्हेंबर - १, ६, १६, १८, २०,२२.--------------------------------अधिक मास - १८ जुलै ते १६ ऑगस्टचातुर्मास : २९ जून ते २३ नोव्हेंबर

राज्यातील पंचांगकर्त्यांचे एकमतपूर्वी चातुर्मासात (पर्जन्यकाळात) काळात घरासमोर मांडवात विवाह करीत असल्याने आणि प्रवासाची साधने नसल्याने लग्न मुहूर्त दिले जात नव्हते. मात्र, महाराष्ट्र वगळता अन्य राज्यात मागील ६० ते ७० वर्षापासून पंचागकर्ते चातुर्मासात लग्नमुहूर्त देत आहे. आता मंगल कार्यालयात लग्न लावले जातात व प्रवासही सुखकर झाल्याने महाराष्ट्रातही चातुर्मास काळात लग्नतिथी देण्यात याव्यात यावर राज्यातील सर्व पंचांगकर्त्यांची १८ फेब्रुवारी २०१९ बैठकीत एकमत झाले. त्यानंतर पंचांगात मुख्यकालातील लग्नमुहूर्त सोबतच गौणकाल/चातुर्मासतील मुहूर्त व आवश्यकता असल्यास गुरु किंवा शुक्र यांच्या अस्तकालातील लग्नमुहूर्त पंचांगात देणे सुरु झाले.

आपत्कालीन लग्न मुहूर्त कोणासाठीचातुर्मासात आपत्कालीन लग्न मुहूर्त देण्यात आले आहेत. ज्यांचे आधीच लग्न ठरले आहे किंवा साखरपुडा झाला आहे, घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती आजारी आहे, त्यांच्या डोळ्यासमोर लग्न लावायचे आहे किंवा कोणाची नोकरी विदेशात आहे. त्यांना दिवाळीनंतर सुट्ट्या मिळत नाहीत, अशांनी आपत्कालात लग्न करावे, तसेच मुख्य काळात ज्यांना मंगल कार्यालय उपलब्ध झाले नाही. काही अडचण आली, त्यांनी आपत्कालात लग्न करावे. चातुर्मासात लग्न उद्योगात काम नसते. त्यांनाही आपत्कालीन लग्न तिथीमुळे काम मिळेल.- वेदमूर्ती सुरेश केदारे गुरुजी.

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक