शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता बीबीए-एमबीए करा औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठात; येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश

By योगेश पायघन | Updated: February 6, 2023 19:17 IST

राष्ट्रीय विधी विद्यापीठात पुढील शैक्षणिक वर्षात ४ नवे अभ्यासक्रम

औरंगाबादयेथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात (एमएनएलयू) बी.ए. एलएलबी. (हाॅनर्स), बीबीए एलएलबी(हाॅनर्स), एलएलएम पीएच.डी तसेच एलएलडी हे चार अभ्यासक्रम सध्या सुरू आहेत. पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून विद्यापीठामार्फत बीबीए एमबीए (इंटिग्रेटेड कोर्स इन लाॅ ॲण्ड मॅनेजमेंट), एमबीए (कोर्स एडमिनीस्ट्रेशन ॲण्ड फायनान्सीयल सर्व्हीसेसे), एमए (लाॅ, फाॅरेन्सीक सायन्स ॲण्ड टेक्नालाॅजी) तसेच एमए (पल्बिक पाॅलिसी) हे अभ्यासक्रम सुरु करण्याचे नियोजन आहे.

मार्च २०१७ मध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबाद येथे कार्यान्वीत झाल्यावर या विद्यापीठाचे विविध इमारतीच्या बांधकामासाठी कांचनवाडी परिसरातील गट क्रं. १९ मध्ये अस्तित्वात असलेले २४ सदनिका व ६ बंगले व ८ एकर जमीनीसह विद्यापीठाकडे सरकारने हस्तांतर केले. लागूनच असलेले गायरान ९ एकर आणि त्याशेजारची वाल्मी या संस्थेची ३३ एकर जमिन ही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.यापूर्वी इमारतीच्या बांधकामासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये रुपये १४९.७२ कोटी इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी ९८ कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत मिळाला. २०१८-२०२३ या कालावधी मध्ये प्रति वर्ष रुपये ५ कोटी रूपयांचे विद्यापीठाला अनुदान मिळाले आहे.

विविध इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर१६ जानेवारी रोजी २२२.६३ कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळली. या निधीतून महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील प्रशासकीय इमारत, ग्रंथालय इमारत व लेक्चर हॉल (अकॅडमिक ब्लॉक) चे बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत विशेष बाब म्हणून विद्यापीठाच्या ग्रंथालयासाठी रुपये २० कोटी निधी मंजूर झाला असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधीचा प्रयत्नएमएनएलयू विद्यार्थ्यांच्या काळानुरुप गरजा लक्षात घेता व भविष्यातील संधीची पुर्तता करण्याकरिता या विद्यापीठात अपरंपारीक व बृह विद्या शाखीय अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना रोजगार व व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध देण्यात येतील. नजीकच्या काळात हे विद्यापीठ विधी शिक्षण क्षेत्रातील एक दर्जेदार व अग्रगण्य ज्ञानकेंद्र म्हणुन नावारुपास येईल. असे कुलगुरू प्रा. डॉ. के.व्ही.एस. सर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद