शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विकासकापाठोपाठ भूखंड खरेदीदारांनाही सिडकोने बजावल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:08 IST

सिडको अधिसूचित क्षेत्रात नियमबाह्य रेखांकन व बांधकाम करणाऱ्या विकासकापाठोपाठ भूखंड खरेदी करणाऱ्यांविरुद्धही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मोकळ्या भूखंडावर अनधिकृत रेखांकन केल्याप्रकरणी प्रशासनाने नुकत्याच ३३ जणांना नोटिसा बजावल्या आहेत.

ठळक मुद्देसिडको वाळूज महानगर : अनधिकृत रेखांकन केल्याप्रकरणी ३३ जणांना नोटिसा

वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रात नियमबाह्य रेखांकन व बांधकाम करणाऱ्या विकासकापाठोपाठ भूखंड खरेदी करणाऱ्यांविरुद्धही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मोकळ्या भूखंडावर अनधिकृत रेखांकन केल्याप्रकरणी प्रशासनाने नुकत्याच ३३ जणांना नोटिसा बजावल्या आहेत.सिडको वाळूज महानगर परिसरातील वडगाव कोल्हाटी, तीसगाव, साजापूर, शेकापूर, रांजणगाव, वाळूज आदी भागांत सिडको अधिसूचित क्षेत्रात सिडकोची परवानगी न घेता अनेकांनी भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अनेक विकासकांनी ग्रामपंचायतीला हाताशी धरून लेआऊट टाकून प्लॉट विक्री केली जात आहे. विकासकाडून अनेकांनी मोकळे भूखंड खरेदी करून स्वप्नातील घर बांधण्यासाठी लेआऊट टाकले आहेत. यात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याने सिडको हद्दीत नियमबाह्य रेखांकन व बांधकाम करणाºया विकासकाविरुद्ध प्रशासनाने कारवाई सुरू केली असून, अनेक विकासकांविरुद्ध वाळूज, वाळूज एमआयडीसी व सातारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. अनेकांना नोटिसा बजावल्या आहेत. आता विकासकापाठोपाठ प्रशासनाने भूखंड खरेदी करणाºयांविरुद्धही कारवाई सुरू केली आहे. मोकळ्या भूखंडावर अनधिकृत रेखांकन करून भूखंड स्वत:च्या नावे करून सातबाºयाला नावे लावणाºया ३३ भूखंडधारकांना महाराष्ट्र प्रादेशिक आणि नियोजन अधिनियम १९६६ च्या कलम ५४ नुसार नोटिसा बजावल्या आहेत. सिडकोच्या या कारवाईमुळे भूखंडधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.यांना बजावल्या नोटिसा...सिडको अधिसूचित क्षेत्रात मोकळ्या भूखंडावर अनधिकृत रेखांकन करून, तसेच भूखंड आपल्या नावे करून सातबाºयाला नावे लावणाºया सुमित्रा देशपांडे, मंदाकिनी मुराळकर, मंजूश्री बनसोडे, श्रीधर फेस्टे, जोत्स्ना टापर, प्रदीप टापर, विजया बारवाल, दुर्गादास पिसोळकर, सुरेश देशपांडे, ओमप्रकाश चांडक, रामराव रोडे, प्रमिला तोडकरी, दयानंद विभुते, गिरीश जोशी, सुभाष रोडे, सुजाता जैस्वाल, अनुपमा गायकवाड, अनुपमा कमलाकर गायकवाड, शैलेजा पांढरे, गोविंदराव सूर्यवंशी, किरण बोडखे, सर्फराज खान, मोईन सिद्दीकी, गंगाधर चलवदे, अनिल सोनवणे, सु.ल. जाधव, रुकसन फकरे, स्वरूपा साखरे, देवेंद्र खिडाकर, राकेश दुग्गल, प्रवीण सासवडे यांना नोटिसा बजावल्याचे सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcidco aurangabadसिडको औरंगाबाद