शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

साडेबारा हजार व्यापाऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:34 AM

जीएसटीएनमध्ये नोंदणी केलेले पण मागील वर्षभर एकही विवरणपत्र न दाखल करणाºया १२६३१ व्यापा-यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे.

ठळक मुद्देविवरण न भरणाºयांवर कारवाई : एसजीएसटी विभागाची तीन जिल्ह्यांत विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जीएसटीएनमध्ये नोंदणी केलेले पण मागील वर्षभर एकही विवरणपत्र न दाखल करणाºया १२६३१ व्यापा-यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे. यासाठी औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्यांत स्टेट जीएसटी विभागातर्फे विशेष मोहीम घेण्यात आली. विशेष म्हणजे तब्बल ९८ विक्रीकर निरीक्षकांनी शहरातील शोरूमपासून ते ग्रामीण भागातील किराणा दुकानापर्यंत जाऊन प्रत्यक्षात ४८७३ जणांच्या हातात नोटिसा दिल्या. जीएसटी (गुडस् अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स) ही नव करप्रणाली लागू होऊन वर्ष पूर्ण झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २२१३७ व्यापारी, जालना ४९५८ व बीड जिल्ह्यातील ५८१७ व्यापाºयांनी जीएसटीएनमध्ये आपली नोंदणी केली आहे. मात्र, यापैकी १२६३१ करदाते असे आहेत की, त्यांनी मागील वर्षभरात एकही जीएसटीआर-३ बी विवरणपत्र दाखल केले नाही. त्यांच्याकडून विवरणपत्र दाखल करून घेण्यासंबंधी पाठपुरावा करण्यात येत आहे. जीएसटीअंतर्गत व्यापाºयांनी स्वत: आॅनलाईन विवरणपत्र दाखल करणे अपेक्षित होते. नवीन कायदा असल्याने जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर २०१७ या पहिल्या महिन्यासाठी केंद्र सरकारने विवरणपत्र उशिरा दाखल करणाºयांची लेट फी माफ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर जीएसटीआर-३ बी विवरणपत्र विलंबाने दाखल केल्यास ५० रुपये प्रतिदिन इतके विलंब शुल्क भरणे अनिवार्य आहे. तसेच वार्षिक उलाढाल २० लाखांपेक्षा कमी असेल अशा करदात्यांना विलंब शुल्क प्रतिदिन २० रुपये भरावे लागणार आहे. यामुळे आता नोटीस बजावलेल्या करदात्यांना विवरणपत्र भरणे सक्तीचे आहेच शिवाय कराचा भरणा व्याज व विलंब शुल्कासह भरावा लागणार आहे. मात्र, विशेष मोहिमेंतर्गत विक्रीकर निरीक्षकांना असे आढळून आले की, अनेकांना दर महिन्याला विवरणपत्र भरण्याची माहितीच नव्हती. काहींची २० लाखांखाली वार्षिक उलाढाल असली तरी त्यांनी भीतीपोटी जीएसटीएन नोंदणी केली होती; पण नंतर विवरणपत्र भरले नाही, अशा करपात्र नसलेल्या व्यापाºयांना जीएसटीएन नोंदणी रद्द करता येऊ शकते. विशेष मोहिमेंतर्गत विक्रीकर निरीक्षक ४८७३ करदात्यांपर्यंत जाऊन पोहोचले. त्यांना माहिती दिल्यानंतर आता अनेकजण विवरणपत्रही भरतआहे.१९० व्यापारी सापडलेच नाहीतजीएसटीएनमध्ये नोंदणी केलेल्यांपैकी १९० व्यापारी (करदाते) विक्रीकरण निरीक्षकांना सापडलेच नाहीत. जीएसटीएनमध्ये व्यापाºयांनी दिलेल्या पत्त्यावर विक्रीकर निरीक्षक पोहोचले तेव्हा तिथे ते व्यापारी नव्हते. त्यातील काही व्यापाºयांनी दुसºया भागात दुकान सुरूकेले, तर काही व्यापाºयांनी आपले व्यवसायच बंद केले असल्याची माहिती मिळाली.नोंदणी रद्द करण्यासाठी १०० अर्ज दाखलज्या व्यापाºयांची २० लाखांखाली वार्षिक उलाढाल आहे, अशा व्यापाºयांनी जीएसटीएनमध्ये आपली नोंदणी केली. आता त्यांना नोंदणी रद्द करायची आहे. त्यांना स्वत:लाही आॅनलाईन नोंदणी रद्द करता येते. तसेच अशा व्यापाºयांना सहकार्य करण्यासाठी स्टेट जीएसटी विभागात मदत केंद्र सुरूकरण्यात आले आहे. आतापर्यंत १०० व्यापाºयांनी त्यासंदर्भात अर्ज केले आहे. तसेच ज्यांना दंडासह विवरणपत्र भरायचे आहे, त्यांनाही मदत केंद्रात मार्गदर्शन केल्या जात आहे.-दीपा मुधोळ-मुंडे, सहआयुक्त, स्टेट जीएसटी विभाग

टॅग्स :GSTजीएसटीAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायGST Officeमुख्य जीएसटी कार्यालय