शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आमची कुळे काढून काही होणार नाही, जे शिल्लक आहेत, ते सांभाळा अन्यथा कुटुंबापुरतेच उराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 12:42 IST

उद्धव ठाकरेंवर आम्ही चार व आमच्या गटाचे चार अशी स्थिती येईल.

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी काळात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ पुरतेच मर्यादीत राहतील. आमची कुळे काढून काही होणार नाही. जे शिल्लक आहेत, ते सांभाळा नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना कधी पळवतील, हे कळणार देखील नाही, असा ठाकरेंना चिमटा काढत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी जोरदार टीका केली.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आमच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोबत त्यांना भावली. आता ठाकरेंना अंधारात पवारच दिवा दाखवित असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या सगळ्या टीका-टिपणीत त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर दिलदार नेता असल्याची स्तुतिसुमने उधळली. प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे १२ ऑगस्ट रोजी हाती घेतल्यानंतर बावनकुळे यांचा १५ वा जिल्हा दौरा औरंगाबादेत होता. दिवसभरात बैठका, रॅली, मेळावे, भेटी आदी भरगच्च कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत झाले.

पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर उत्तरे देताना बावनकुळे म्हणाले, ठाकरेंवर आम्ही चार व आमच्या गटाचे चार अशी स्थिती येईल. मुंबईत सध्या ठाकरे गटाकडे चार जणांचे फोटो दिसत आहेत. राज्य, विकासाबाबत बोलायचे सोडून त्यांना आता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना अंधारमय जीवन दिसते आहे. समोर काळोख पसरला असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार त्यांना दूरून दिवा दाखवित आहेत. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका करीत आहेत. ते मुंबईत आले तर एवढा धसका कशासाठी घेतला. शहा आणि ठाकरे यांची तुलना म्हणजे सूर्याला दिवा दाखविण्याप्रमाणे आहे. सध्या ते नैराश्येतून तोंडसुख घेत आहेत.

यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, विक्रांत पाटील, बापू घडमोडे, राहुल लोणीकर, अनिल मकरिये, विजय औताडे उपस्थित होते.

राज ठाकरेंवर स्तुतिसुमने....राज ठाकरेंशी वैयक्तिक मैत्री असून ते दिलदार नेते आहेत. त्यांच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, मात्र जे बोलणार ते करणार असा नेता आहे. बाकी लोकांसारखे त्यांचे नाही. राज यांच्यासोबत युतीवर बावनकुळे यांनी काहीही उत्तर दिले नाही. उद्धव ठाकरेंसोबत मैत्री सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सोबत त्यांना भावल्याने आमच्या सोबतची मैत्री सोडल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद