शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत ‘नोटा’ चा बोलबाला; ३ टक्के मतदारांनी नाकारले उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 18:38 IST

NOTA Vote ६१७ पैकी ५७९ ग्रामपंचायतींमधील ४ हजार ८९ सदस्य निवडून देण्यासाठी मतदान झाले.

ठळक मुद्दे५७९ पंचायतीत लढले ११ हजार ४९९ उमेदवार

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अंदाजे ३ टक्के म्हणजेच २७ ते ३० हजार ग्रामीण मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायास मत दिल्याने निवडणुकीत ‘नोटा’ चा बोलबाला पाहण्यास मिळाला. ११ हजार ४९९ उमेदवार निवडणूक मैदानात होते. नोटा या पर्यायावर मते दिल्यामुळे अनेक ठिकाणी १० ते २० मतांच्या फरकाने उमेदवार विजयी झाले, तर १८ ठिकाणी समान मते मिळालेल्या ठिकाणी चिठ्ठी काढून विजयी उमेदवार घोषित करावा लागला.

१८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. तालुकानिहाय मतमोजणीची जबाबदारी असल्यामुळे तहसीलदार पातळीवरून सर्व माहिती संकलित करून अहवाल करण्याचे काम बुधवारी देखील सुरू होते. ६१७ पैकी ५७९ ग्रामपंचायतींमधील ४ हजार ८९ सदस्य निवडून देण्यासाठी मतदान झाले. ३२ ग्रामपंचायत बिनविरोध होऊन ६१० सदस्य बिनविरोध निवडून आले होते. ११ हजार ४९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ५ लाख ५१ हजार ८२२ महिला तर ६ लाख ४ हजार ८०४ पुरूष अशा एकूण ११ लाख ५६ हजार ६२६ पैकी ९ लाख ३३ हजार ३०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

१८ प्रभागांसाठी काढावी लागली चिठ्ठीजिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतीतील १८ प्रभागात उभ्या असलेल्या ३६ उमेदवारांना समान मते मिळाली. या ठिकाणी चिठ्ठी काढून उमेदवाराला विजयी घोषित करावे लागले. चुरशीची लढत झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात ३, पैठण ३, वैजापूर ४, सिल्लोड १, गंगापूर १, फुलंब्री १ तर कन्नडमधील ५ ग्रामपंचायतीतील उमेदवारांना भाग्याने साथ दिल्याने त्यांचा विजय झाला.

आयोगाची माहिती अशीराज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त जे. टी. मोरे यांनी सांगितले, पूर्ण जिल्ह्यातून मतदान, नोटाची माहिती संकलन सुरू आहे. माहिती येताच ती आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्याची प्रक्रिया सुरू होईल.

निवडणूक नियम काय सांगतोनिवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी उमेदवारांपेक्षा नोटा पर्यायाला अधिक मतं असतात, त्या ठिकाणी नोटानंतर सर्वाधिक मतं मिळविणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. परंतु औरंगाबाद जिल्ह्यात नोटामुळे निवडणूक नियम वापरण्याची गरज कुठे पडले नाही.

नोटाला मिळालेली एकूण मतेजिल्ह्यात सरासरी झालेल्या मतदानाच्या तुलनेत ३ टक्के मतदान नोटा या पर्यायाला मिळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २७ ते ३० हजारांच्या दरम्यान हे प्रमाण असल्याचे प्रशासकीय सूत्रांचे मत आहे. तालुकानिहाय माहिती संकलन सुरू असून त्यानंतर अंतिम आकडा समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतVotingमतदान