शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एक दोन नव्हे, तब्बल १४ कोटी झाडांनी बहरणार समृद्धी महामार्ग

By विकास राऊत | Updated: December 11, 2023 12:35 IST

वर्षभरात ३० टक्के झाडे जळाली; वृक्षारोपणासाठी ७०० कोटींचा होणार खर्च

छत्रपती संभाजीनगर : मुंबई ते नागपूरपर्यंत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा १४ कोटी वृक्षांनी बहरणार आहे. यासाठी ७०० काेटी रुपयांचा खर्च होणार असून, एक वर्षापासून हे काम सुरू झाले आहे. आजवर लागवड केलेल्या झाडांपैकी ३० टक्के झाडे जळाली असून, तेथे पुन्हा नव्याने झाडे लावण्यात येतील, असा दावा सूत्रांनी केला. एक किलोमीटरच्या अंतरात सुमारे २ लाख झाडे लावण्याचे नियोजन आहे. 

७२० किमीचा हा मार्ग आहे.समृद्धीचे भूसंपादन करतांना लाखो झाडे गेली. त्या मोबदल्यात राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावण्यास सुरुवात केली आहे. एका झाडासाठी महामंडळाचे ५० रुपये खर्च होत आहेत. लावण्यात येत असलेली झाडे पाच वर्षांत मोठी होणे शक्य आहे. भविष्यात ७०० किलोमीटर लांब आणि दोन्ही बाजूंनी ३५ मीटर रुंदीचा हरित पट्टा हिरवाईने नटलेला दिसेल.

जिल्ह्यात २ कोटी ४० लाख झाडे लावणारसमृद्धीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १२० किमी अंतर आहे. १ किमीमध्ये २ लाख झाडे याप्रमाणे २ कोटी ४० लाख झाडे लावण्यात येणार आहेत. यातील काही अंतरात झाडे लावण्यात आली आहेत. यात वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, जांभूळ, करंज, शमी, बेल या देशी झाडांचा समावेश असेल.

लोकार्पणानंतर अपघातामुळे चर्चेतडिसेंबर २०२२ मध्ये समृद्धीचे लोकार्पण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्याचे मे २०२३ मध्ये लोकार्पण झाले. समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील ५०२ किमीचे लोकार्पण होऊन ११ महिने, तर दुसऱ्या टप्प्यातील ८० किमी मार्गाचे लोकार्पण होऊन सात महिने झाले आहेत. या ११ महिन्यांत महामार्गावर सर्व मिळून १२८५ अपघात झाले असून, त्यात १२५ जणांचा बळी गेला आहे.

३० टक्के झाडे जळालीजिल्ह्याच्या हद्दीत आजवर लावलेली ३० टक्के झाडे जळाली आहेत. तेथे पुन्हा वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाच वर्षे होईपर्यंत ठेकेदारांची ठराविक रक्कम एमएसआरडीसीकडे राखीव असणार आहे.

‘रोड हिप्नॉटिझम’ वर कृत्रिम उपायजिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर सध्या नैसर्गिकऐवजी आर्टिफिशियल फुलझाडांच्या सजावटीचे काम सुरू आहे. महामार्गाच्या ‘रोड हिप्नॉटिझम’ ला ब्रेक लावण्यासाठी हा कृत्रिम उपाय महामंडळाने हाती घेतला आहे. नैसर्गिक झाडांची हिरवळ तत्काळ मोठी होणे शक्य नसल्यामुळे या कृत्रिम पर्यायाचे काम सुरू आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबाद