शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

सगळाच हापूस कोकणातील नसतो; देवगडच्या नावाखाली परराज्यातील आंबा ग्राहकांच्या माथी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 15, 2023 13:58 IST

नाव कोकणातील देवगडचं अन् कर्नाटकचा हापूस आंबा ग्राहकांच्या माथी 

छत्रपती संभाजीनगर : ‘आमच्याकडे कोकणातील अस्सल देवगडचा हापूस मिळतो’ असे बॅनर आपण रस्त्यां-रस्त्यांवर वाचत असाल. दुकानात ठेवलेले सर्वच आंबे जसे हापूस नसतात, तसेच सर्वच हापूस आंबा हा देवगडचा नसतो. अहो, अनेकदा ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेत विक्रेत्यांकडून कोकणातील हापूसऐवजी कर्नाटकचा हापूस ग्राहकांच्या माथी मारला जातो. ही ग्राहकांची फसवणूक आहे, जागो ग्राहक जागो...

शहरात कुठून येतो हापूसशहरात हापूस आंबा कोकणातून म्हणजे रत्नागिरी, देवगड येथून आणला जातो. याशिवाय कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांतून हापूस आंबा मोठ्या प्रमाणात शहरात विक्रीसाठी येतो. मात्र, या परराज्यातील हापूसला कोकणातील हापूसची चव येत नाही.

देवगड व परराज्यातील हापूसमधील फरकजे नेहमी देवगडचा हापूस आंबा खातात, त्या खवय्यांनाच तो आंबा चवीने ओळखता येतो. हापूस आंबा ओळखण्यात अनेकदा व्यापारीही फसतात. मात्र, देवगड व कर्नाटक हापूसमधील फरक पुढीलप्रमाणे

देवगड हापूस- कर्नाटकातील हापूस१) हापूस आंब्याची साल पातळ असते. १) हापूस आंब्याची साल जाड असते.२) हा हापूस गोलाकार असतो. २) हापूस थोडासा उभट, लांब असतो.३) तोंडाशी केशरी किंवा लालसर व खालच्या बाजूला पिवळसर असतो. ३) तोंडाशी पिवळसर आणि खालच्या बाजूला हिरवट असतो.४) हापूसच्या सुगंधाचा दरवळ पसरतो. ४) या हापूसला सुगंध नसतो.५) ४ ते ५ दिवस टिकतो. ५) दोन दिवसांत खराब होतो.६) खराब होत नाही, सुकून जातो. ६) काळा डाग पडतो.

आपल्याकडे नंबर एक हापूस शक्यतो येत नाहीआपल्या शहरात शक्यतो नंबर एक हापूस विक्रीसाठी येत नाही. काहीजण आणतात, पण तो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. आपल्या येथे क्वालिटीनुसार दोन, तीन, चार नंबरचे आंबे येतात.

हापूसच्या किमतीतील फरकदेवगड हापूस (डझन) परराज्यातील हापूस८०० ते १२०० रुपये --- ५०० ते ७०० रुपये

टॅग्स :MangoआंबाAurangabadऔरंगाबादMarketबाजार