शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकही दगड आदित्य ठाकरेंच्या गाडीवर फेकला गेला नाहीः औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 14:06 IST

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद कार्यक्रमात डीजे बंद करण्यावरून राडा

औरंगाबाद: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मंगळवारी शिवसंवाद कार्यक्रमासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे आले असता. डिजे बंद केल्याच्या कारणावरून वाद झाल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. मात्र, ग्रामीण पोलिसांनी याबाबत खुलासा करून दगडफेकीचा आरोप फेटाळला आहे. 

ठाकरे गटाच्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सातव्या शिवसंवाद यात्रेनिमित्त मंगळवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातून औरंगाबादच्या दौऱ्यावर आले. वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे त्यांचा शिवसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. कार्यक्रम स्थळापासून हाकेच्या अंतरावर रमाबाई आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रम सुरू होता. कार्यकर्ते डी.जे.लावून जयंती उत्सव साजरा करीत होते. या डि.जे.चा आदित्य यांच्या भाषणाला अडथळा येत असल्याचे पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डी.जे. बंद करायला लावला. यातून वाद झाला.यानंतर हा वाद चिघळला. हे लक्षात येताच आदित्य यांनी स्टेजवरून उतरून उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी शिवशक्ती, भिमशक्ती यांची युती झाली आहे. मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला डी.जे. वाजवायचा असेल तर वाजवा, असे म्हणाले. मात्र डि.जे. बंद केल्याने तेथे गदारोळ झाला. यावेळी तणाव वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कडक बंदोबस्तात आदित्य यांचा ताफा महालगावातून बाहेर काढला. यावेळी काहीजण या ताफ्यावर धावून आले. यावेळी दगडफेक झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. 

एकही दगड फेकला गेला नाहीयाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार म्हणाले की, महालगाव येथील आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यावर त्यांचा ताफा निघाला असताना काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यात एक माध्यम प्रतिनिधी किरकोळ जखमी झाला आहे. परंतु यावेळी दगडफेक झाली नाही. सभेत किंवा आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आला नसल्याचा दावाही ग्रामीण पोलिसांनी केला आहे.

काही अडचण आली असेल तर माफी मागतोया साऱ्या प्रकारावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी माईकवर बोललो, काही कारणास्तव साऊंड बंद झाला असेल. एकमेकांना समजून घ्यावे लागते. मी माईकवर माफीही मागितली. संविधानाच्या रक्षणासाठी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आलीय. काही अडचण आली असेल तर माफी मागतो. पण एवढे मोठे कारण नाही. डीजे ५-१० मिनिटांसाठी बंद केला असेल. पण मी माईकवर सांगितले डिजे चालू द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

अंबादास दानवेंचं पोलीस महासंचालकांना खरमरीत पत्रआदित्य ठाकरे यांची शिवासंवाद यात्रा औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगाव मंगळवारी होती. तेव्हा तेथील ग्राम सचिवालयासमोरील मैदानावर सभा सुरू असताना तिथे अज्ञात जमावाकडून दगड मारण्यात आला. तसेच सभा संपवून तिथून निघतानाही आदित्य ठाकरे यांच्या कारवर दगड मारण्यात आले. तसेच सभेच्या ठिकाणी हिंसक जमाव चाल करून आला. सदर प्रकरणात सुरक्षेमध्ये अक्षम्य कसूर झाली आहे. त्याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना