शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तण वाढ नाही, पाणीही लागते कमी; शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपर ठरतोय उत्पन्न वाढीसाठी वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 20:17 IST

पारंपरिक शेती केल्याने शेतीतून उत्पन्न कमी आणि कष्ट आणि खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेती करण्याकडे वळले आहेत.

- सोपान कोठाळेकेळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. भाजीपाल्यासह इतर पिकांसाठी शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर करत असून या पेपरमुळे जमिनीत तणाची वाढ होत नसून पिकांसाठी पाणीदेखील कमी लागत आहे. परिणामी, हा पेपर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

पारंपरिक शेती केल्याने शेतीतून उत्पन्न कमी आणि कष्ट आणि खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेती करण्याकडे वळले आहेत. शेतात तण वाढू नये, पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यासाठी पाणी कमी लागावे, पिकाचे संरक्षण व्हावे, शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे, याकरिता सद्य:स्थितीत शेतकरी अनेक उपाययोजना करताना दिसून येत आहेत. केळगावसह आमठाणा, शिंदेफळ परिसरातील शेतकरी मिरची, कापूस यासारख्या पिकाला संरक्षण मिळावे म्हणून मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. याशिवाय या पेपरमुळे तापमान आणि आर्द्रतेवर नियंत्रण राहत असल्याने पीक वाढीला मोठा फायदा होतो. अधिक पाऊस झाला तरी त्याचा फारसा परिणाम या पिकावर होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या पेपरची मागणी बाजारात वाढताना दिसत आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे पाण्याची कमतरता शेतकऱ्यांना भासत असते. त्यामुळे अनेक शेतकरी या पेपरचा पिकासाठी वापर करत आहेत.

मल्चिंग पेपरचे बंडल मिळते चौदाशे रुपयांनामल्चिंग पेपरच्या एका बंडलची किमत बाजारात १ हजार ४०० रुपये असून त्याचा वापर मिरचीच्या एक हजार रोपांसाठी केला जातो. या रोपासाठी पाच गुंठे शेती लागते. हा पेपर महाग जरी असला तरी मिरचीचे उत्पन्न वाढत असल्याने ते खरेदी करण्यास शेतकऱ्यांना परवडत आहे.

पिकाची उगवण्याची क्षमता चांगलीमल्चिंग पेपरमुळे पिकातील खुरपणीच्या खर्चात मोठी बचत असून त्याला हाताने खत टाकण्याची गरज नसते. यामुळे मजुरी खर्च वाढतो. या पेपरमुळे ड्रीपद्वारे पिकास खत सोडण्यास सोपे जात असून खर्चाची बचत होते. पिकाची उगवण्याची क्षमता चांगली असते.- सागर पंडित, शेतकरी, शिंदेफळ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र