शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाळूच्या ठेक्याला मुहूर्त ठरेना: अवैध उपसा काही थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 19:10 IST

नवीन नियमानुसार जिल्हास्तरीय समितीची बैठक तीन महिन्यांतून तर तालुका समितीला दोन महिन्यांतून एकदा बैठक घेण्याची तरतूद होती; परंतु कोरोनामुळे बैठकच झाली नाही.

ठळक मुद्दे सध्या जिल्ह्यात कुठेही वाळूउपसा होत नाही, तरीही चोरट्या मार्गाने वाळू शहरात आणली जातेचितेगाव परिसरात अवैध उत्खनन

औरंगाबाद : नवीन नियमानुसार वाळू ठेक्यांच्या उत्खननाचा कालावधी पाच वर्षांसाठी केला; परंतु अंमलबजावणी होण्यापूर्वीच कोरोनाचे संकट आल्यामुळे शासनाच्या महसुलाला फटका बसला. ठेक्याला ठेंगा दाखवीत चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा सुरूच असून लॉकडाऊनच्या काळातही महसूल विभागाला वाळू जप्त करण्याच्या कराव्या लागल्या. 

नवीन नियमानुसार जिल्हास्तरीय समितीची बैठक तीन महिन्यांतून तर तालुका समितीला दोन महिन्यांतून एकदा बैठक घेण्याची तरतूद होती; परंतु कोरोनामुळे बैठकच झाली नाही. या धोरणानुसार वाळूघाटांचे लिलाव जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात आहेत. यातून ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळणार आहे; परंतु समितीची बैठकच न झाल्याने सर्व काही रखडले. 

नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मध्ये वाळूठेका निश्चिती, वाळू उत्खननाची प्रक्रिया व किंमत निश्चित करण्यासाठी  नियमावली तयार केली. त्याचीही अंमलबजावणी झाली नाही.  सध्या जिल्ह्यात कुठेही वाळूउपसा होत नाही, तरीही चोरट्या मार्गाने वाळू शहरात आणली जात आहे. अनेक ठिकाणी अवैधरीत्या वाळूचे साठे केले जात असून तेथून वाळूची विक्री होते. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ, पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, सार्वजिनक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आदी सदस्य, तर जिल्हा खनिकर्म अधिकारी सदस्य सचिव पदावर राहतील. तालुकास्तरीय वाळू सनियंत्रण समितीही स्थापण होाईल.

चितेगाव परिसरात अवैध उत्खननतालुक्यातील चितेगाव तांडा नं. २ येथे अवैध मुरूम उत्खननामुळे डोंगर पोखरला जात आहे. त्यामुळे  ग्रामस्थांना गावातील मुख्य रस्त्यावर ये-जा करताना अडचण येत आहे.  प्रशासनाची परवानगी न घेता उत्खनन चालू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. मागील काही वर्षांपासून अवैध उत्खनन होत असून, यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या प्रकरणाची माहिती तलाठी, तहसीलदारांना ग्रामस्थांनी तक्राररूपाने दिली; परंतु यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाने अवैध उत्खननाला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :sandवाळूAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद