शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'देशापुढे कोणी मोठे नाही'; ध्वजारोहणासाठी डॉ. कराड उशिरा आल्याने जलील, दानवे भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 19:00 IST

घरोघरी तिरंगा लावा म्हणता आणि स्वतः ध्वजारोहणास उशीर करता.

औरंगाबाद: किल्ले अर्क परिसरात उभारण्यात आलेल्या १०० फुट उंच तिरंगा ध्वजाचे लोकार्पण कार्यक्रमात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड २० मिनिटे उशिरा आल्याने खा. इम्तियाज जलील चांगलेच भडकले. घरोघरी तिरंगा लावा म्हणता आणि स्वतः ध्वजारोहणास उशीर करता. देशापुढे कोणीही मोठे नाही, कोणतेही काम मोठे नाही, अशा शब्दात खा. जलील यांनी डॉ. कराड यांना कार्यक्रमस्थळी सुनावले. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील ध्वजारोहणास उशीर झाल्याने नाराजी व्यक्त केली.

आज सकाळी किल्लेअर्क परिसरात सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी शहरातील तिसऱ्या सर्वात उंच झेंड्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड याच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यासाठी जिल्ह्याचे खासदार आणि सर्व आमदार आमंत्रित होते. खा. इम्तियाज जलील, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण वेळेच्या आधी कार्यक्रम स्थळी आले होते. दरम्यान, नियोजित ९.४५ वाजेची वेळ टळून गेली तरी केंद्रीय मंत्री भागवत कराड ध्वजारोहणास आले नाही. यामुळे खा. जलील आणि विरोधीपक्ष नेते दानवे चांगलेच संतप्त झाले. दरम्यान, १० वाजून २ मिनिटांनी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. जलील आणि दानवे यांनी रोष व्यक्त करताच, देशाच्या कार्यक्रमास विरोध करू नका, असे आवाहन करत डॉ. कराड यांनी वेळ मारून नेत ध्वजारोहण पार पाडले.

देशापुढे कोणी मोठे नाही

एकीकडे घरोघरी तिरंगा झेंडा लावा म्हणता आणि ध्वजारोहणास उशीर येऊन झेंड्याचा अपमान करता. दुसऱ्यांना आदर करा असे सांगता. २० मिनिटे मंत्री उशिरा कसे आले. दुसऱ्या कार्यक्रमास ठीक आहे . पण ध्वजारोहणास नको. देशा पुढे कोणी मोठे नाही.

- खा. इम्तियाज जलील

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBhagwat Karadडॉ. भागवतImtiaz Jalilइम्तियाज जलीलAmbadas Danweyअंबादास दानवेAtul Saveअतुल सावे