शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूरात कोणीही जिंकले तरी होणार विक्रम; प्रशांत बंब-सतीश चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 18:27 IST

दोन्ही उमेदवार तगडे असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. तसेच कार्यकर्त्यांचे नेटवर्कही चांगले असल्याने तुल्यबळ लढत होत आहे.

- जयेश निरपळ

गंगापूर :गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे आमदार प्रशांत बंब आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सतीश चव्हाण यांच्यातच प्रमुख लढत होत असून, दोन्ही उमेदवार तगडे असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. तसेच कार्यकर्त्यांचे नेटवर्कही चांगले असल्याने तुल्यबळ लढत होत आहे. आ. बंब जिंकले तर या मतदारसंघातून चौथ्यांदा विजय मिळविणारे ते पहिले आमदार ठरतील आणि आ. चव्हाण जिंकले तर विधान परिषदेत जिंकल्यानंतर विधानसभा जिंकणारे ते पहिले आमदार ठरतील. त्यामुळे या लढतीत आ. बंब विजयी चौकार मारणार की आ. चव्हाण पहिल्यांदाच विधान परिषद सोडून विधानसभेत जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सतीश चव्हाण यांच्या जमेच्या बाजू१. निवडणूक नियोजनात मनुष्यबळ हाताळणीचा तगडा अनुभव२. उत्तम प्रशासक, संघटक असल्याने कार्यकर्त्यांची भक्कम फळी३. कमी कालावधीत विकासकामे करून निवडणुकीला सामोरे गेल्यामुळे मतदारांचा विश्वास मिळवला.४. मतदारसंघात दांडगा जनसंपर्क५. गावोगावी असलेल्या क्रमांक दोनच्या नेतृत्वाला सोबत घेतले

उणे मुद्दे१. बाहेरचा उमेदवार असल्याचा शिक्का२. स्वपक्षासह आघाडीतील नेत्यांची काही प्रमाणात नाराजी३. काही गावांत जुन्या हक्काच्या कार्यकर्त्यांची उणीव४. स्पष्टवक्तेपणामुळे काही जण दुरावले५. महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेत्याची साथ नाही.

प्रशांत बंब यांच्या जमेच्या बाजू१. स्थानिक उमेदवार असल्याने मतदारसंघावर पकड२. लोकांपर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचवल्या३. दूरदृष्टीचा आणि ‘पक्क्या’ नियोजनाचा नेता म्हणून ख्याती४. सातत्याने विविध कार्यक्रम आणि उपक्रम यांच्या माध्यमातून संपर्क५. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख

उणे मुद्दे१. १५ वर्षांच्या कार्यकाळात वैयक्तिक लाभाच्या व्यतिरिक्त भरीव कामगिरी नाही.२. निरनिराळ्या निवडणुकांच्या निमित्ताने तालुक्यातील बऱ्याच नेत्यांशी राजकीय तंटा३. सरकारविरोधी बदलाची मानसिकता असणारा वर्ग४. आजवर केलेली मोठी आश्वासने अपूर्ण५. शिक्षकांचा प्रचंड रोष

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकgangapur-acगंगापूरSatish Chavanसतीश चव्हाणPrashant Bambप्रशांत बंब