शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नोकऱ्या नाहीत! आता दुग्ध उत्पादनाकडे बेरोजगारांचा ओढा

By विजय सरवदे | Updated: December 15, 2023 11:05 IST

नावीन्यपूर्ण योजनांसाठी राज्यात पावणेतीन लाख अर्ज 

छत्रपती संभाजीनगर : पदभरतीच्या फारशा जाहिराती निघत नाहीत. परिणामी, नोकरीची हमी नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणाई नैराश्याच्या गर्तेत आलेली आपण ऐकले असेल. मात्र, यावर मात करीत जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या दुधाळ गाई-म्हशी, शेळी-मेंढी व कुक्कुट पालन व्यवसाय या वैयक्तिक लाभाच्या नावीन्यपूर्ण योजनांकडे राज्यातील तरुणाईचा ओढा वाढत चालला आहे. राज्यभरात तब्बल पावणेतीन लाख अर्ज पशुसंवर्धन विभागाकडे प्राप्त झालेले आहेत.

ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह पशुपालक आणि शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील चार वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवून लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया राबविली जाते. विशेष म्हणजे, पूर्वी एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांस दरवर्षी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. प्राप्त परिपूर्ण प्रस्तावांतून प्रतीक्षा यादी तयार केली जात असून, ती पुढील पाच वर्षांपर्यंत लागू असते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाला प्रतीक्षा यादीतील क्रमानुसार नियोजन करणे शक्य झाले आहे.

या आहेत विविध योजनानावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दोन दुधाळ गाई - म्हशींचे गट, दहा अधिक एक शेळी - मेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाहाय्य दिले जाते. जिल्हास्तरीय योजनेत १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ अधिक ३ तलंगा (चांगल्या जातीच्या कोंबड्या) गट वाटप अशा योजना आहेत.

पशुसंवर्धन विभागाकडे प्राप्त अर्जएकदिवसीय सुधारित कोंबडीच्या पिलांचे गट वाटपासाठी ५ हजार २९१ अर्ज, जिल्हास्तरीय योजनांतर्गत तलंगा गट वाटपासाठी ५ हजार ५८९ अर्ज, दुधाळ गायी - म्हशींच्या वाटपासाठी ३८ हजार ७०९ अर्ज, शेळी - मेंढी गट वाटपासाठी ३३ हजार ०५७ अर्ज, राज्यस्तरीय योजनांतर्गत एक हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी १७ हजार ३०८ अर्ज, दुधाळ गायी - म्हशी वाटपासाठी १ लाख १२ हजार ४५२ अर्ज, शेळी-मेंढी गट वाटपासाठी ६६ हजार ९५२ अर्ज राज्यातील सर्व जि. प. पशुसंवर्धन विभागाकडे प्राप्त आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादmilkदूधFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र